MLA Santosh Bangar Wish : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, विघ्नहर्त्या बाप्पाकडून बांगरांनी घेतला नवसाचा मोदक...

Shivsena News : आपण याच नवसाच्या मोदकामुळे वर्षभरात आमदार झालो असे बांगर मोठ्या अभिमानाने सांगतात.
Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News, Hingoli
Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News, HingoliSarkarnama
Published on
Updated on

Hingoli Political News : राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धूम सुरू आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यासाठी सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते, लोकप्रतिनिधीदेखील रस्त्यावर उतरले आहेत. (Shivsena News) हिंगोलीच्या प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा चिंतमणी अशी ओळख असलेल्या बाप्पाच्या मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सहभागी झाले आहेत.

Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News, Hingoli
Ashok Chavan On Assembly Speaker : अशोक चव्हाणांना का आठवला सनी देओलच्या चित्रपटाचा डायलाॅग...

गणरायाला निरोप देताना २०२४ मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी त्यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीला साकडे घातले. (Hingoli) तसेच नवस पूर्ण करणारा मोदकही मुख्यमंत्र्यांसाठी घेतला. मी नवसाचा मोदक घेतला आणि वर्षभरात आमदार झालो. आता एकनाथ शिंदे हेच पुन्हा २०२४ मध्ये मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी नवसाचा मोदक घेतल्याचे बांगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हिंगोलीच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या नवसाला पावणाऱ्या चिंतामणी गणपतीचा मोदक घेण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. (Santosh Bangar) जे जे भाविक विघ्नहर्ता गणपती बाप्पाला नवस बोलतात, ते नवस पूर्ण झाल्यानंतर १ हजार मोदकांचा प्रसाद वाटप करतात. हा मोदक घेऊन आपल्या इच्छा बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण करण्यासाठी लोकांची मोठी झुबंड उडत असते.

आपण याच नवसाच्या मोदकामुळे वर्षभरात आमदार झालो, असे बांगर मोठ्या अभिमानाने सांगतात. तो मोदक आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी घेतला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर २०२४ मध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी बाप्पाला साकडे घातले. नवसाचा मोदक आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, असेही बांगर म्हणाले.

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यासाठी मोठी स्पर्धा आतापासूनच सुरू झाली आहे. भाजपचे नेते फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा दावा करत आहेत, तर दुसरीकडे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांचे समर्थक चिठ्ठी लिहून लालबागच्या राजाला साकडं घालत आहेत. त्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद मुख्यमंत्रिपदासाठी नेमका कुणाला मिळणार? हे पुढच्या वर्षीच स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com