Sonia Gandhi On Women Reservation : काँग्रेसचा 'महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा; 'हे राजीव गांधींचे स्वप्न...'

Sonia Gandhi Support to Women Reservation : पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी माझे जीवनसाथी राजीव गांधी यांनी प्रयत्न केले.
Sonia Gandhi Support to Women Reservation :
Sonia Gandhi Support to Women Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : सोनिया गांधी यांनी मोदी सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात आणलेल्या महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला असून, या विधेयकात एससी-एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षणाची मागणी केली आहे. आपल्या भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या, 'हे विधेयक माजी पंतप्रधान राजीव गांधींचे स्वप्न होते. माझ्या आयुष्यातील हा एक सुवर्ण क्षण आहे." (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Sonia Gandhi Support to Women Reservation :
Nagpur OBC Morcha : फडणवीसांच्या शब्दावर नाही भाजप नेत्यांनाच विश्वास, धडक मोर्चात झाले सहभागी !

सोनिया गांधी म्हणाल्या, "स्वातंत्र्याची लढाई आणि नव्या भारताच्या निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषांसोबत महिलांनी लढाई दिली आहे. महिला त्यांच्या जबाबदारी खाली जखडून गेल्या नाहीत. सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, अरुणा असफअली, विजयालक्ष्मी पंडित, राजकुमार अमृतकौर यांच्यासह लक्ष लक्ष महिलांनी आजपर्यंत कठीण वेळ आलेली असतानाही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या."

"इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व या प्रवासात एक तेजस्वी आणि महिलांच्या सक्षम नेतृत्वाचं उदाहरण आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी माझे जीवनसाथी राजीव गांधी यांनी विधेयक आणले. आणि महिलांना स्थानिक पातळीवर प्रतिनिधित्व दिले. मात्र, संसदेतील महिला आरक्षण विधेयक त्यावेळी राज्यसभेत सात मतांनी नाकारलं गेलं होतं. आज मात्र माझ्या आयुष्यातील हा एक सुवर्ण क्षण आहे," असे सोनिया गांधी म्हणाल्या.

Sonia Gandhi Support to Women Reservation :
Sonia Gandhi On Women Reservation : 'महिला आरक्षणावर' सोनिया गांधी मांडणार काँग्रेसची भूमिका; मित्रपक्षांची अडचण होणार ?

सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असतानाच, त्यांनी एससी-एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठीही आरक्षणाची मागणी केली आहे. आरजेडी-जेडीयू आणि सपा या इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनीही या कोट्यामध्ये महिलाआरक्षणाची मागणी करत होते, मित्रपक्षांच्या या मागणीला सोनिया गांधींनी पाठिंबा दिला आहे.

(Edited By -Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com