Sonia Gandhi On Women Reservation : 'महिला आरक्षणावर' सोनिया गांधी मांडणार काँग्रेसची भूमिका; मित्रपक्षांची अडचण होणार ?

Mahila Arakshan Bill : आरक्षणावर काँग्रेस पक्षाची भूमिका काय ?
Sonia Gandhi On Women Reservation :
Sonia Gandhi On Women Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. ऐतिहासिक अशा 'महिला आरक्षण विधेयका'वर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या विधेयकावर काँग्रेसकडून मुख्य वक्त्या असणार आहेत. या विधेयकावर सोनिया गांधी आपली सविस्तर भूमिका मांडणार आहेत. (Latest Marathi News)

Sonia Gandhi On Women Reservation :
Women Reservation Bill: पंतप्रधान मोदींचा धडाका; नव्या संसदेच्या पहिल्याच दिवशी महिला विधेयकाची घोषणा

सोनिया गांधी यांच्या संसदेतील संबोधनात, मित्रपक्षांच्या आणि विशेषत: राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि समाजवादी पार्टी यांची या विधेयकावर असलेल्या भूमिकेबाबत त्या काय बोलणार याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल महिला आरक्षण विधेयक सभागृहात ते मांडले.

Sonia Gandhi On Women Reservation :
NCP Activist Challenge To Padalkar : गोपीचंद पडळकरांनी सोलापुरात येऊन दाखवावं; राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे ओपन चॅलेंज

या विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. आज सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होईल, तेव्हा यावर चर्चा होईल.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com