Pimpri-Chinchwad : 'स्वाईन फ्लू' नंतर आता कोरोनानेही घेतला पिंपरीत एक बळी; प्रशासन अलर्ट

Pune News : मुंबई आणि पुण्यात कोरोना पुन्हा वाढतोय?
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : H3N2 या 'स्वाईन फ्लू'च्या नव्या विषाणूने गेल्या महिन्यात (ता.१६) पिंपरी-चिंचवडला ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कोरोनाने ७५ वर्षीय एका वृद्धेचा बळी घेतला आहे. यावर्षी कोरोनाने झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

दरम्यान, वरील दोन्ही साथींमुळे पिंपरी पालिका प्रशासन पुन्हा अॅक्शन मोडवर आले आहे. कारण सध्या राज्यात फक्त मुंबई आणि पुण्यातच कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसच उद्योगनगरीत सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

Pimpri-Chinchwad
Chhatrapati Smabhajinagar Market Committee : नेत्यांची शिष्टाई फळाला, महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे युतीचंही जमलं..

दुसरीकडे, फक्त या दोन शहरांतच ही साथ पुन्हा का आली आहे, याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अभ्यास सुरु केला आहे. पण, तूर्त त्यांना त्यामागील कारण समजलेले नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून गेलात, तर मास्क वापरण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

कोरोनाने बळी गेलेली वृद्ध महिला ही शहरातील एका खासगी रुग्णालयात ९ एप्रिलला गुडघे प्रत्यारोपणासाठी दाखल झाली होती. दुसऱ्याच दिवशी तिच्यावर ही शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर १२ तारखेला तिला श्वसनाचा त्रास सुरु झाला.

त्यामुळे तिची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल १३ तारखेला पॉजिटीव्ह आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ तारखेला तिचे निधन झाले. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात हे जुने आजार होते.

Pimpri-Chinchwad
Ramtek APMC Election : कॉंग्रेस नेत्याचा समावेश असलेली चार पक्षांची वज्रमूठ, सुनील केदारांना शह देणार का?

नव्या स्वाईन फ्लू चा एकही रुग्ण सध्या उद्योगनगरीतील रुग्णालयात दाखल नाही. मात्र, कोरोनाचे दोघे रुग्णालयात, तर १६२ रुग्ण हे घरी विलगीकरणात आहेत. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी या दोन्ही साथींची कॉमन लक्षणे आहेत.

पालिका प्रशासनाने आपल्या पाच रुग्णालयातील प्रत्येकी दहा अशा पन्नास खाटा या खास या रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. नव्या आजाराने घाबरून न जाण्याचे तसेच सर्दी, खोकला, घसादुखी, ताप ही लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या पालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेच्या वैद्यकिय विभागाने नागरिकांना केले आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com