Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; पहिल्या यादीवरून शिवकुमारांना घेरले

D.K. Shivkumar : या आठवड्यात काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होणार
Congress Protest in Bengaluru Headquarter
Congress Protest in Bengaluru Headquarter Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह भाजपने एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. दरम्यान, काँग्रेसने २२४ पैकी आपल्या १२४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील उमेदवारांवरुनच कर्नाटक काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यादी जाहीर झालेल्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या नावासाठी बंगळुरू येथील राज्य मुख्यलयात घुसून घोषणाबाजी केली. तसेच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना घेराव घातला.

Congress Protest in Bengaluru Headquarter
CBI Diamond Jubilee Celebrations; 'सीबीआय' हा न्यायाचा ब्रँड; पंतप्रधान मोदींकडून सीबीआयवर कौतुकाचा वर्षाव!

कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने (Congress) आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे. या आठवड्यात दुसरी १०० मतदारसंघासाठी यादी जाहीर करण्यात येणार आहे. तत्पुर्वीच आज बंगळुरू येथील काँग्रेस मुख्यालयात काही गटांनी घुसून घोषणाबाजी करत निदर्शने केली. दरम्यान या गटांनी मुख्यालयात येणाऱ्या शिवकुमार (D.K. Shivkumar) यांना घेराव घातला. यामुळे येथे काही काळ गोंधळांचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत कर्नाटक काँग्रेस कार्याध्यक्ष सलीम अहमद (Saleem Ahmed) म्हणाले की, "या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या बाजूने सकारात्मक वातावरण आहे. तसे मतदारसंघांचे सर्वेक्षण अहवालही मिळत आहे. काँग्रेस जिंकणार असल्याने पक्षाच्या तिकिटांना मागणी वाढली आहे. काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक मंगळवारी होणार आहे. त्यावेळी सर्वोत्तम उमेदवारास तिकिटे देण्याचा विचार होईल.”

Congress Protest in Bengaluru Headquarter
Ncp Leadaer Join BRS News : राष्ट्रवादीच्या माजी आमदारानंतर पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बीआरएसच्या गळाला..

तारिकेरे मतदारसंघातूम एक गट एचएम गोपीकृष्ण आणि दुसरा मोलाकालुरू मतदारसंघात योगेशबाबू यांच्यासाठी 'लॉबिंग' करत असल्याची माहिती आहे. गोपीकृष्ण यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पक्ष त्यांना उमेदवारी देणार नसल्याच्या माहितीमुळे गोपीकृष्ण यांचे समर्थक नाराज झाले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि राज्य काँग्रेसचे प्रमुख डी.के. शिवकुमार यांच्यात गटबाजी कर्नाटक काँग्रेसच्या अडचणीत आहे. त्यातच अशा प्रकारामुळे काँग्रेसच्या कार्यकर्ते नाराजी होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, काँग्रेसने २५ मार्च रोजी १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. भाजपने मात्र अद्याप आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. इतर पक्षांनीही यादी जाहीर केली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com