Ncp Leadaer Join BRS News : राष्ट्रवादीच्या माजी आमदारानंतर पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बीआरएसच्या गळाला..

Maharashtra : कदीर मौलाना यांनी राष्ट्रवादीकडून दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते.
Ncp Leadaer Join BRS News : राष्ट्रवादीच्या माजी आमदारानंतर पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बीआरएसच्या गळाला..
Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस) पक्षाला महाराष्ट्रात हळूहळू पाठिंबा मिळू लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे (Shankarrao Dhondge) यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर शहरातून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले कदीर मौलाना यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.

Ncp Leadaer Join BRS News : राष्ट्रवादीच्या माजी आमदारानंतर पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बीआरएसच्या गळाला..
Sanjay Shirsat On Ashok Chavan : अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीआधी भाजपत जाणार : शिवसेना नेत्याचे मोठे भाकीत

मौलाना व त्यांच्या समर्थकांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) यांची हैदराबाद येथे जाऊन भेट घेतली व पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत (Ncp) राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष वैजापरमधील अभय पाटील चिकटगांवकर यांनी देखील केसीआर यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. हैदराबादेत या सर्वांना केसीआर यांनी शंकरअण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश दिला.

नांदेड जिल्ह्यात केसीआर यांच्या आतापर्यंत दोन सभा झाल्या. या माध्यमातून अनेक माजी आमदार, पदाधिकारी त्यांच्या गळाला लागले. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी दोन राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी असलेल्या कदीर मौलाना, अभय पाटील चिकटगांवकर यांनी बीआरएस सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

कदीर मौलाना यांनी राष्ट्रवादीकडून दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. तर वैजापूरचे अभय पाटील चिकटगांवकर यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने विद्यमान आमदार व अभय पाटील यांचे काका भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना डावलून उमेदवारी दिली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः वैजापूरमध्ये त्यांच्यासाठी सभा घेतली होती, मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. दरम्यान, पक्षाकडून सातत्याने डावलेले जात असल्याची भावना मौलाना आणि अभय पाटील व त्यांच्या समर्थकांच्या मनात होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत नव्या राज्यातील पक्षाची निवड पुढील राजकीय वाटचालीसाठी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com