Sharad Pawar on New Parliament: नवीन संसदेच्या उद्घाटनावरून पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, विरोधकांना विश्वासात..

New Parliament Building : "नवीन संसदेची इमारत बांधताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं"
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Political News: देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्या (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र, या नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलंच राजकारण तापलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही या उद्घाटनावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजपवर जोरदार निशाणा साधला.

"नवीन संसदेची इमारत बांधताना आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही. विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Sharad Pawar
Niti Aayog meeting: नीती आयोगाच्या बैठकीतच विरोधकांनी ताकद दाखवली; तब्बल आठ मुख्यमंत्र्यांची दांडी!

शरद पवार म्हणाले, "मी अनेक वर्षांपासून राज्यसभेचा सदस्य आहे. मात्र, ज्या संसद भवनात आम्ही बसतो तिथे नवी वास्तू बांधायची हे वृत्तपत्रात वाचलं. त्यानंतर भूमिपूजनही झालं. त्यावेळीही आमंत्रण नव्हतं. नवीन संसदेची इमारत बांधताना आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही. विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं".

"त्यामुळे काहींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा हा निर्णय आम्हाला मान्य आहे. आता नवीन संसदेची इमारत तयार झाली आहे. पण उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होत असतं, अशी पद्धत आहे. मात्र, त्यांनी ते केलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी आपली भूमिका घेतली, त्याला माझा पाठिंबा आहे", असं पवार यावेळी म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com