INDIA And West Bengal : इंडिया आघाडीतील कुरबुरी वाढल्या; पश्चिम बंगालमध्ये पडली ठिणगी; काय आहे कारण?

Congress Vs CPIM Vs Trinamool Congress : माकपने काँग्रेस, तृणमूलविरोधात लढण्याची केली घोषणा
INDIA Alliance
INDIA AllianceSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मूठ बांधण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीची मूठ बांधली जात असतानाच अनेक कारणांवरून मतभेद पाहण्यास मिळत आहेत. या वादाचा भडका पश्चिम बंगालमधून उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

एकीकडे इंडिया (INDIA) आघाडीमध्ये काही दिवसांपासून देशातील विविध प्रादेशिक पक्ष सामावून घेण्याचा धडाका लावलेला आहे. यातच आघाडीतील पक्षांत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंडिया बळकट करण्याचे प्रयत्न करणार असले तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबतची लढाई सुरूच राहील, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) ज्येष्ठ नेते सृजन चक्रवती यांनी व्यक्त केली. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आक्रमक होऊन इंडिया आघाडीत वाद होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

INDIA Alliance
Supriya Sule News : महिलांबाबत भाजपची मानसिकता काय, हे चांगलंच माहीत; सुप्रिया सुळेंनी सांगितले दोन किस्से

दरम्यान, इंडियात माकप पक्षास स्थान नको, अशी भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली होती. त्यातच सीपीआय-एमने राज्यातील आपली भूमिका स्पष्ट केल्याने इंडिया आघाडीत एकत्र काम करण्याच्या निर्धाराला तडा गेल्याचे जाणवत आहे. दरम्यान, इंडिया आघाडीत सहभागी झालेले पक्ष आपापल्या राज्यातील विरोधक आहेत. त्यामुळे ही आघाडी टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून केली जात आहे.

प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यातच केरळ किंवा पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेस (Congress), माकप आणि तृणमूल काँग्रेस हे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपविरुद्ध लढण्यात आमची निर्णायक भूमिका आहे, असेही सृजन चक्रवती यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेवर इंडिया आघाडीतील काही पक्षांकडून टीका केली जात आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य अभिषेक बॅनर्जी माकपच्या या निर्णयातून त्यांचा संधीसाधूपणा दिसतो, तर त्यांच्या या भूमिकेवर भाजपचे अध्यक्ष संदीप भट्टाचार्य यांनी सडकून टीका केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

INDIA Alliance
MP Hemant Patil On Reservation: मराठा आरक्षणावर खासदारांच्या बैठकीत दिशा ठरणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com