Marathwada Political News : महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. राज्याच्या विविध भागात विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. (Maratha Reservation) कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठीही जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सतरा दिवस उपोषण सुरू होते.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मराठा आरक्षणावर शिंदे गटाच्या खासदारांची भूमिका काय? असा सवालदेखील केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आल्याचे (Hingoli) हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक खासदारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे.
विशेषतः मराठा खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. (Marathwada) आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता शिंदे गटातील खासदारांनी मराठा आरक्षणावर काय भूमिका घ्यायची? कुठल्या दिशेने पुढे जायचे यावर विचार सुरू केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या विशेष अधिवेशनादरम्यान या विषयावर बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या बैठकीसंदर्भात खासदारांना फोन करून व पत्र पाठवून निरोप देण्यात आले होते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणावर अनेक गावांत आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांची धग सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे, अशी आमची भावना आहे.
यासाठी सर्व खासदारांची बैठक आज घेणार आहोत. अनेक खासदारांना फोन केले आहेत, पत्र पाठवले आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यावर चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत एक दिशा ठरेल, त्यानुसार आम्ही पुढे जाऊ, असेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.