Anil Patil On Eknath Khadse: खडसेंची परिस्थिती 'न घर का, न घाट का'; अनिल पाटलांनी खडसेंवर घेतलं तोंडसुख

Anil Patil attack on Eknath Khadse: खडसे सासरे असल्याने त्यांचा मान ठेवणं हे रक्षा खडसे यांचे कर्तव्य आहे, पण खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावं, असा एकही कार्यकर्ता बोललेला नाही,
Anil Patil On Eknath Khadse News
Anil Patil On Eknath Khadse NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या घरवापसीसाठी दिल्लीत त्यांचे मित्र विनोद तावडे लॉबिंग करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर चांगलेच तोंडसुख घेतले. (Anil Patil attack on Eknath Khadse)

"एकनाथ खडसे हे दिशाहीन झालेले नेतृत्व आहे, त्यांना भाजपत कोणी घेत नाही, त्यामुळे जावं तरी कुठे जावं, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. खडसेंची परिस्थिती 'न घर का न घाट का' अशी झाली आहे. त्यांच्या सूनबाई भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आपले सासऱ्याबाबत व्यक्त केलेली इच्छा ही परिवारातील मानसन्मानसाठी आहे. खडसे सासरे असल्याने त्यांचा मान ठेवणं हे रक्षा खडसे यांचे कर्तव्य आहे. पण खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावं, असा एकही कार्यकर्ता बोललेला नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रक्षा खडसे यांनी आपल्या सासऱ्यांच्या घरवापसीबाबत सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. “गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्ष प्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार आहे. रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Anil Patil On Eknath Khadse News
Anil Patil On Uddhav Thackeray: किती दिवस वडिलांच्या जिवावर मते मागणार? अनिल पाटलांचा ठाकरेंना सवाल

एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य त्यांचे विरोधक गिरीश महाजन यांनीदेखील केले आहे. “एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही त्यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे," महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीत पक्षासाठी होणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात तावडे यांचा सहभाग असतो. त्यांच्या शब्दाला मान असून, बिहारमध्ये आज जो काही भाजपच्या बाजूने सत्ताबदल झाला आहे त्याचे मास्टर माइंड तावडे आहेत. तावडे सर्वच राज्यात भाजप पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याचा एक भाग म्हणजे एकेकाळी आपले असलेले आणि आता बाहेर असलेल्या माजी भाजप नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपच्या दिल्ली पक्षश्रेष्ठींमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या तावडे यांच्या शब्दाला पक्षात सध्या वजन असून, या वजनाचा वापर करून ते खडसे यांना पुन्हा भाजपवासी करू शकतात, अशी चर्चा आहे.

R

Anil Patil On Eknath Khadse News
Manohar Joshi Passes Away: मनोहर जोशींकडे मुख्यमंत्रिपद, पण रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे…!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com