Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. डीपफेक व्हिडिओचा सुळसुळाट आता वाढू लागला असून, आगामी लोकसभा निवडणुकीतही त्याचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच देशातील सेलिब्रिटींची डीपफेक व्हिडिओमुळे डोकेदुखी वाढू लागली आहे. केंद्र सरकारने याबाबत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सक्त ताकीद देत त्यावर नियंत्रण मिळवण्यास सांगितले आहे, पण त्यानंतरही असे व्हिडिओ व्हायरल होत असून, आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचाही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे 2012-18 या कालावधीत राष्ट्रपतीनियुक्त खासदार होते. त्यांनी सोशल मीडियातून (Social Media) या व्हिडिओबाबत संताप व्यक्त केला आहे. स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट असे गेमिंग अॅपचे नाव आहे. डीपफेक व्हिडिओमध्य ते केवळ या अॅपची जाहिरात करताना दाखवण्यात आले नसून मुलगी साराही (Sara Tendulkar) अॅपचा वापर करून पैसे मिळवत असल्याचा दावा डीपफेक व्हिडिओमध्ये (Deepfake Video) करण्यात आला आहे.
सचिन यांचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच याबाबत खुलासा केला आहे. तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाविषयी त्यांनी अशी चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी त्वरित कारवाई व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले, हा व्हिडिओ फेक असून, धोका देण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा असा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकाने असे व्हिडिओ, जाहिराती आणि अॅपची तक्रार करावी.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्यांनाही सचिन यांनी सल्ला दिला आहे. त्यांनी अलर्ट राहून आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. चुकीची माहिती आणि बातम्यांना रोखण्यासाठी आणि डीपफेकचा वापर थांबवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सचिन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचाही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. तसेच कतरिना कैफ, आलिया भट, प्रियांका चोप्रा यांचेही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. असे व्हिडिओ थांबवण्यासाठी सरकारकडून आता तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.
सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस
काही दिवसांपूर्वी माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व सोशल मीडिया कंपन्यांना डीपफेक व्हिडिओंवर नियंत्रणासाठी नोटीस बजावल्याची माहिती दिली होती. डीपफेक हा आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यादृष्टीने तातडीने आवश्यक कारवाई करून संबंधित व्हिडिओ हटवावेत, अशी नोटीस बजावली आहे. त्यांनीही कारवाई सुरू केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली होती.
लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो गैरवापर
मागील काही वर्षांपासून निवडणुकांसाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जात आहे. भाजपसह काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्षही त्यामध्ये मागे नाहीत. पण त्याचा नकारात्मक वापरही वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांना फटका बसत आहे. बनावट फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता डीपफेक व्हिडिओचे नवे संकट राजकीय नेत्यांवर ओढवू शकते.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.