Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature : ममतांच्या टीमकडून 'बूम बूम पठाण' करणार 'बॅटिंग'; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याविरुद्ध उमेदवारी!

Yusuf Pathan In TMC : ममता बॅनर्जींचा एक घाव दोन तुकडे...
Yusuf Pathan TMC Candidature
Yusuf Pathan TMC CandidatureSarkarnama
Published on
Updated on

West Benagal News : माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील सभेत त्यांच्या नावाची घोषणा केली. टीएमसीने त्यांना बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे खासदार आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध क्रिकेटपटूला मैदानात उतरवून ममता बॅनर्जींनी मोठी खेळी केली आहे. (Latets Marathi News)

Yusuf Pathan TMC Candidature
Bengal Sandeshkhali News : मोदींच्या बंगाल दौऱ्याआधीच ममतांनी पलटवला डाव; भाजप नेत्याला 'सेक्स रॅकेट'मध्ये अटक...

कोलकाता येथील मेगा रॅलीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कोणताही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सर्व 42 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या यादीत कूचबिहारमधून जगदीश चंद्र बसुनिया, अलीपुरद्वारमधून प्रकाश चिक बराक, जलपाईगुडीमधून निर्मल चंद्र राय, दार्जिलिंगमधून गोपाला लामा, रायगंजमधून कृष्णा कल्याणी, मालदा उत्तरमधून प्रसून बॅनर्जी, मालदा दक्षिणमधून शाहनवाज अली रेहमान यांना तिकिटे देण्यात आली आहेत. जंगीपूर येथील खलीलूर रहमान यांना देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसऱ्या माजी क्रिकेटपटूला तिकीट -

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनाही बर्दवानमधील दुर्गापूरमधून तिकीट दिले आहे. टीएमसीच्या या यादीत लोकसभेचे तिकीट मिळालेल्या आमदारांचाही समावेश आहे. त्यात जलपाईगुडीतून निर्मल चंद्र राय, राणाघाटातून मुकुटमणी अधिकारी, मिदनापूरमधून जून मलिया, बांकुरा येथून अरुप चक्रवर्ती यांना तिकीट देण्यात आले आहे. युथ टीएमसीच्या अध्यक्षा सयोनी घोष यांना जाधवपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

Yusuf Pathan TMC Candidature
Sandeshkhali Case : ममता सरकारने हायकोर्टाचा आदेश धुडकावला; CBI चे अधिकारी रिकाम्या हाताने परतले

या यादीत ममता बॅनर्जी यांनी 32 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अशा स्थितीत ममता बॅनर्जींनी आपल्या उमेदवारांमध्ये मोठा फेरबदल केला आहे, असे म्हणता येईल. चित्रपट अभिनेत्री रचना बॅनर्जी यांना हुगळीतून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय माजी आयपीएस अधिकारी प्रसून बॅनर्जी मालदा उत्तरमधून निवडणूक (Election) लढवणार आहेत. यावेळी नुसरत जहाँचे तिकीटही रद्द करण्यात आले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com