श्रीलंकेत अंधार! इंधन संपले अन् जीवनावश्यक वस्तूंचे भाव भिडले गगनाला

श्रीलंकेची (Sri Lanka) अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे.
Sri Lanka Crisis
Sri Lanka CrisisSarkarnama
Published on
Updated on

कोलंबो : श्रीलंकेची (Sri Lanka) अर्थव्यवस्था (Economy) मोठ्या संकटात सापडली आहे. वीज निर्मिती करण्यासाठी पुरेशा प्रमाणात इंधन नसल्याने सरकारने भारनियमन सात तासांहून दहा तास केले आहे. श्रीलंकेकडील परकी चलनाचा साठा संपल्याने देशासमोर आर्थिक आणि ऊर्जा संकट उभे ठाकले आहे. देशातील जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

श्रीलंकेत हजारो लोकांना पेट्रोलची (Petrol) खरेदी करण्यासाठी अनेक तास पेट्रोल पंपासमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. देशाकडे पुरेशा प्रमाणात परकी चलनाचा साठा नसल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवरही निर्बंध आले आहेत. या महिन्यात सुरूवातीपासूनच देशात सात तास भारनियमन केले जात होते. आता भारनियमनाचा कालावधी वाढवून दहा तास करण्यात आला आहे.

Sri Lanka Crisis
मजूर प्रकरणी अडचणीत आलेेले दरेकर अमित शहांकडे मागणार दाद

औष्णिक विद्युत केंद्रांत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी कोळसाच उपलब्ध नसल्याने साडेसातशे मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारच्या मालकीच्या सेलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपनीने वाहनचालकांना इंधनासाठी पेट्रोल पंपांबाहेर रांगा न लावण्याचे आवाहन केले आहेत. यामुळे श्रीलंका सरकारने परदेशातून पेट्रोल आणि डिझेल मागविले आहे. परंतु ते नेमके कधी येईल हे मात्र स्पष्ट नाही.

Sri Lanka Crisis
भाजपचे विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीत जाणार? अखेर त्यांनीच दिलं उत्तर

भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची उपकंपनी असणाऱ्या एलआयओसीकडून श्रीलंका सरकार सहा हजार मेट्रिक टन डिझेल (Diesel) खरेदी करणार आहे. हे डिझेल आपत्कालीन सेवा आणि ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने श्रीलंकेला 1 अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. याआधीही फेब्रुवारी महिन्यामध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदीसाठी श्रीलंकेला अर्थसाहाय्य देण्याचे ठरले होते. त्याच एक भाग म्हणून 1 अब्ज डॉलरचा निधी देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com