Karnataka Election 2023 : भाजप आमदाराच्या गाडीत कोट्यवधींची रोकड जप्त, गुन्हा दाखल!

Karnataka Assembly Election 2023 : "24.45 कोटी रूपयांची दारू जप्त केली आहे.."
Karnataka Election 2023 :
Karnataka Election 2023 :Sarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : निवडणुकांचे बिगुल वाजले की, राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होत असते. राजकीय पक्ष व नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कृती केली जाते. अनेकदा यात बेकायदेशीर मार्गांचासुद्धा अवलंब केला जातो. यात अनेकदा काळा पैशांचाही वापर केला जातो.

सद्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटकचा सीमा भाग असलेल्या कोल्हापूरमध्ये या पार्श्वभूमीवर काही कारवाया घडताना दिसत आहेत. कर्नाटकातील सत्ताधारी आमदाराकडे मोठी रोकड सापडली आहे. या प्रकरणी आत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Karnataka Election 2023 :
Satara News : सातारचे दोन्ही राजे शशिकांत शिंदेंच्या प्रेमात; महेश शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न..

ते भाजपचे आमदार कोण?

कर्नाटक राज्यातील रामदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे (BJP) उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित असलेली आहे. या गाडीत तब्बल 1 कोटी 54 लाखांची रोकड सापडली आहे. ही मोठी रक्कम आता जप्त करण्यात आली.

तसेच या बेहिशेबी रोकड प्रकरणी भाजप आमदार चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. निवडणुका जशा नजीक येत आहेत, तशा अनधिकृत रोकड सापडण्याचा सिलसला वाढत आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या पत्रानुसार मागील आठ दिवसात 69.36 कोटी रुपये रोख, दारू आणि इतर साहित्य जप्त केल्याचे म्हटले होते.

आयकर विभागाकडून पुढील कारवाई सुरू :

कर्नाटक राज्यातील रामदुर्ग विधानसभाचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीमध्ये कोट्यवधींची रोखड सापडल्याने, आयकर विभागाने यासंदर्भात कारवाईचा धडाका लावला आहे. ही रक्कम नेमकी आली कुठून? कुठे जाणार होती. ही माहिती तपास पोलिस घेत असताना, हा काळा पैसा आहे क? याचा शोध आयकर विभागाकडून घेतला जात आहे.

Karnataka Election 2023 :
Nashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांवर इन्कम टॅक्सचे छापे!

कर्नाटकात रोकड जप्त होण्याचा सिलसिला सुरू :

मागील आठवड्यातच कर्नाटकात मोठ्या रकमा जप्त झाल्या होत्या. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या रकमांमध्ये 22.75 कोटी रूपयांची रक्कमल जप्त केले आहे. यामध्ये 24.45 कोटी रूपयांची दारू जप्त केली आहे. मतदारांना वाटण्यासाठी 12 कोटी रूपयांच्या वस्तू सुद्धा आहेत. यामध्ये अंमलीपदार्थ आणि ड्रग्जसुद्धा आहेत. यामध्ये एकूण 69 कोटी 36 लाख 17 हजार 467 रुपयांची मुद्देमाल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com