Nashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांवर इन्कम टॅक्सचे छापे!

Income Tax Raids on Builders in Nashik: आज सकाळी शहरातील सहा प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर कारवाई
Income tax Raid in Nashik
Income tax Raid in NashikSarkarnama

Nashik Income Tax Raid: आज सकाळी शहरातील सहा प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालये तसेच निवासस्थानी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. ही कारवाई अद्यापही सुरु असुन त्याबाबत अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. (Income tax officers scruitiny in builders on Nashik city)

या छाप्यांबाबत प्राप्तीकर विभागाच्या (Income tax) सुत्रांकडून होकार देण्यात आला आहे. मात्र कोणतिही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कारवाई पुर्ण झाल्यावर त्याबाबत माहिती देण्यात येईल, असे वरिष्ठ सुत्रांनी कळविले. (Latest Maharashtra News)

Income tax Raid in Nashik
Nashik MNS News: पदाचा राजीनामा देत दातीर म्हणाले, जन्मभर मनसैनिकच राहीन!

आज सकाळी शहरातील सहा बांधकाम व्यावसायिकांकडे प्राप्तीकर विभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी एकाचवेळी कार्यालय तसेच निवासस्थानी तपासणी सुरु केली. हे सर्व शहरातील प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Income tax Raid in Nashik
Nashik women News : महिनाभरात २१ लाख महिलांकडून अर्ध्या टिकिटाचा लाभ!

सकाळी सातला एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले. त्यात नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई कार्यालयाचे अधिकारी सहभागी आहेत. त्यासाठी बारा पथके करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांची बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व अमराठी व्यावसायिक आहेत. (Latest Nashik News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com