Foreign Visits of Top Leaders: बापरे! पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर कोट्यावधींचा खर्च; आकडा बघुन तुम्हालाही बसेल धक्का...

केंद्रीय मंत्र्याचे परदेश दौरे हे काही नवीन नाहीत. पण या दौऱ्यासाठी होणाऱ्या खर्चाची चर्चा कायम होत असते.
Foreign Visits of Top Leaders
Foreign Visits of Top Leaders
Published on
Updated on

Foreign Visits of Top Leaders : केंद्रीय मंत्र्याचे परदेश दौरे हे काही नवीन नाहीत. पण या दौऱ्यासाठी होणाऱ्या खर्चाची चर्चा कायम होत असते. अशाच प्रकार केंद्रीय मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाची माहिती समोर आली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली.

मुरलीधरन यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील गुरुवारी संसदेत ठेवला. या तपशीलानुसार, 2019 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परदेश दौरे केले आहेत ज्यावर 22.76 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. तर राष्ट्रपतींनी 2019 पासून आठ परदेश दौरे केले असून त्यावर 6.24 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे.

Foreign Visits of Top Leaders
Nashik Graduate Election : तांबेंकडून पराभूत झालेल्या शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाल्या.."ही मतं विकली.."

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर 22 कोटी रुपयांवरुन अधिक खर्च

2019 पासून केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी सहा कोटी, 24 लाख. 31 हजार 424 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 22 कोटी, 76 लाख, 76 हजार, 934 रुपये आणि परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 20 कोटी, 87 लाख, 1 हजार 475 रुपये खर्च करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आतापर्यंत फक्त एकच दौरा

मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 पासून राष्ट्रपतींनी आठ परदेश दौरे केले आहेत. पंतप्रधानांनी 21 आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 86 परदेश दौरे केले. 2019 पासून, पंतप्रधान मोदींनी जपानला तीनदा, अमेरिकेला दोनदा आणि संयुक्त अरब अमिरातीला एकदा भेट दिली आहे. राष्ट्रपतींच्या आठ दौऱ्यांपैकी सात दौरे रामनाथ कोविंद यांनी केले होते. तर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सप्टेंबर 2022 मध्ये यूकेला भेट दिली होती.

कॅनडामधील भारतीयांच्या सुरक्षेला सरकारचे प्राधान्य

कॅनडातील भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि जातीय हिंसाचाराच्या घटनांबाबत सरकारच्या भूमिका काय, या प्रश्नाला उत्तर देताना मुरलीधरन म्हणाले की, कॅनडातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण ही सरकारची प्राथमिकता आहे. कॅनडातील भारतीय मिशन आणि वाणिज्य दूतावास भारतीय समुदायाशी सातत्याने संपर्कात आहे. ज्यात त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com