Munir Ahmed : पाकिस्तानी महिलेशी गुपचूप लग्न? व्हिसा संपल्यानंतरही भारतात लपवलं? मुनीर अहमदने सांगितली Chronology

CRPF Jawan Marriage to a Pakistani woman : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावाचे झाले आहेत. दरम्यान येथे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडावा असे आदेश केंद्र सरकारने दिले होते.
CRPF Jawan Munir Ahmed
CRPF Jawan Munir Ahmedsarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack News : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहे. यात अनेक मोठ्या निर्णयांचा समावेश असून पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेशही यात आहे. मात्र यादरम्यान मुनीर अहमद या सीआरपीएफ जवानानेच पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्याचे आणि ते लपवल्याचे समोर आले होते. यानंतर मुनीरवर सीआरपीएफने बडतर्फीची कारवाई केली होती. त्याचे हे वर्तन देश विघातक असल्याचा ठपका सीआरपीएफकडून ठेवण्यात आला होता. पण आता या प्रकरणात वेगळं वळण आले आहे. बडतर्फ मुनीर अहमदने सीआरपीएफचा दावाच खोटा असल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले असून नेमकं कोण खरं? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

सीआरपीएफ जवान मुनीर अहमदची पत्नी मीनल खान ही पाकिस्तानी असल्याचे समोर आले होते. तर तिचा व्हिसा संपल्यानंतरही ती भारतात राहत होती आणि ही गोष्ट मुनीर अहमदने लपवल्याचे समोर आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर सीआरपीएफने मुनीर अहमदवर पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्याची माहिती लपवण्यासह तिचा व्हिसा संपल्यानंतरही तिला येथे आसरा दिल्याचा ठपका ठेवत बडतर्फ केले.

यावर आता मुनीर अहमदने मौन सोडले आहे. आपण विवाह करण्यासाठी सीआरपीएफकडून रितसर परवानगी घेतल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सांगितले आहे. त्याने आपला विवाह कसा झाला? सीआरपीएफकडे परवानगी कधी आणि कशी मागितली याबाबतची सर्व माहिती माध्यमांना दिली आहे.

CRPF Jawan Munir Ahmed
Pahalgam Terror Attack : 'त्या' सहा पाकिस्तानी महिला अजूनही नाशिकमध्येच, काय कारण?

मुनीर अहमद म्हणाला, आपल्या विवाहाबाबत पहिल्यांदा 31 डिसेंबर 2022 मध्ये मुख्यालयाला कल्पना दिली होती. ज्यात आपण एका पाकिस्तानी महिलेशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी रितसर परवानगी देखील मागितली होती. त्यावेळी मला पासपोर्ट, लग्नपत्रिका आणि शपथपत्राची प्रत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाप्रमाणे, मी माझ्यासह पालक, सरपंच आणि जिल्हा विकास परिषद सदस्य यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या सगळ्याची पडताळणी केल्यानंतरच मला 30 एप्रिल 2024 रोजी मुख्यालयाने लग्नासाठी परवानगी दिली होती. मात्र मुख्यालयातून एनओसी मागितल्यावर तशी कोणतीही तरतूद नसल्याचे मला सांगण्यात आले होते.

24 मे रोजी मीनल खान हिच्याशी मी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाइन लग्न केले. माझ्या लग्नाचे पुरावे म्हणून विवाहाचे फोटो, निकाह कागदपत्रे आणि लग्नाचे प्रमाणपत्र 72 बटालियनला सादर केले होते. यामुळे विदेशी महिलेशी मी लग्न करताना सर्व कायदेशीर बाबी पार पाडल्या होत्या. या बाबींनंतरच 28 फेब्रुवारीला मीनल पहिल्यांदा 15 दिवसांच्या व्हिसावर भारतात आली होती. त्याचवेळी आम्ही मार्चमध्येच दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता आणि त्यासाठी मुलाखतीसारख्या सर्व आवश्यकता पूर्ण झाल्या होत्या. मात्र आता पहलगामची हल्ल्याची घटना घडली आणि आम्हाला दोषी ठरवलं जात असल्याचे मुनीर अहमदचे म्हणणे आहे.

तसेच मुनीर अहमदने आपल्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना, आपल्याला बडतर्फीची कारवाईची माहिती माध्यमांद्वारे मिळाली. त्यानंतर सीआरपीएफकडून पत्र मिळाले. हे पत्र माझ्यासह माझ्या कुटुंबासाठी धक्कादायक आहे. पण आपण लग्नाबाबतची सर्व माहिती याआधीच मुख्यालयाला दिली होती. लग्न एका पाकिस्तानी महिलेशी होणार असल्याचेही कळवत परवानगीही मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतरच लग्न केलं होतं. पण आता सीआरपीएफकडून करण्यात आलेली कारवाई मान्य नाही. त्याविरोधात कोर्टात जाऊ असाही इशारा मुनीर अहमदने यावेळी दिला आहे.

CRPF Jawan Munir Ahmed
Pahalgam Terror Attack : 'त्या' सहा पाकिस्तानी महिला अजूनही नाशिकमध्येच, काय कारण?

सीआरपीएफ दावा काय?

पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यासह पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण सीआरपीएफ जवान मुनीर खानने आपला पाकिस्तानी महिलेशी झालेला विवाह लपवला. त्याने याची माहिती कार्यालयास लग्नानंतर अडीच महिन्यांतरही दिली नाही. तर मीनल खानचा व्हिसाची मुदत संपल्यानंतरही त्याची माहिती न देता भारतात ठेवून घेतले असे आरोप सीआरपीएफकडून करण्यात आले आहेत. तसेच मुनीरला बडतर्फ करत मीनल खानची रवानगी पाकिस्तानात करण्यात येणार होती. त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात तिच्या याचिकेवर सुनावणी झाली. ज्यात कोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतर तिला अटारी-वाघा सीमेवरून परत पाठवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com