Crude Oil Price : तेलाच्या किंमतींचं गणित बदललं! आता गुणवत्ता नाही, ‘लोकेशन’ ठरवतंय भाव; भारतावर काय परिणाम?

Oil prices are now driven by location, risk and access—not just crude quality : होर्मुझ आणि बाब अल-मंदेबमधील वाढत्या सुरक्षेच्या धोक्यामुळे वाहतूक, विमा आणि पुरवठा खर्च वाढला; संघर्षापासून दूर असलेल्या तेलाला प्रीमियम, तर जोखमीच्या मार्गातील तेलाला मोठा डिस्काउंट मिळत आहे.
Crude Oil Price
Crude Oil PriceSarkarnama
Published on
Updated on

crude oil price India : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींबाबत एक मोठी आणि चक्रावून टाकणारी अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत तेलाची किंमत ही त्याची गुणवत्ता, जागतिक मागणी आणि पुरवठा यावर ठरत असे. मात्र, मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाच्या भडक्यामुळे हे समीकरण आता पूर्णपणे बदलले आहे. जागतिक तेल बाजारात आता ' लोकेशन ' सर्वात महत्त्वाची बाब आहे.

तेल किती उत्तम दर्जाचे आहे, यापेक्षा ते 'कुठून येत आहे' आणि 'कोणत्या मार्गाने वाहतूक केली जात आहे', यावर त्याचे भाव ठरत आहेत. एकाच प्रकारच्या तेलाच्या किमतीत स्थानानुसार तब्बल 20 ते 40 डॉलर प्रति बॅरलचा मोठा फरक पाहायला मिळत आहे.

अमेरिका (America)-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने समुद्रातील मुख्य तेल वाहतूक मार्ग अत्यंत धोक्यात आले आहेत. मध्यपूर्वेतील होर्मुझ आणि बाब अल-मंदेब या सागरी मार्गांवर हूती बंडखोर व इराणी सैन्याकडून जहाजांवर होणारे थेट ड्रोन व मिसाईल हल्ले, सागरी सुरुंग आणि व्यापारी जहाजे जप्त केले जाण्याचा मोठा धोका आहे.

सोबतच, सौदी अरेबियासारख्या देशांतील तेल (Oil) पाइपलाइन्सवरील हल्ल्यांमुळे पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. या वाढत्या युद्धाच्या धोक्यामुळे 'वॉर रिस्क इन्शुरन्स'चा खर्च गगनाला भिडला असून, सुरक्षेसाठी मार्ग बदलावा लागल्याने वेळ, इंधन आणि वाहतुकीचा एकूण खर्च प्रचंड वाढला आहे.

Crude Oil Price
India crude oil import bill : इराण युद्धाचा भारताला फटका; महाग तेलामुळे किती वाढणार आर्थिक भार?

होर्मुझची सामुद्रधुनी हा पर्शियन गल्फमधून बाहेर पडणारा हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. युद्धाच्या धोक्यामुळे या मार्गावरील तेलाची वाहतूक थेट निम्म्यावर आली आहे. तसेच बाब अल-मंदेब हा येमेनमधील हूती बंडखोरांच्या कारवायांमुळे या सागरी मार्गावर मोठा धोका निर्माण झाला आहे. जहाजांना जास्त धोका, जास्त वेळ आणि जास्त इंधन लागत असल्याने विम्याच्या रकमा गगनाला भिडल्या आहेत.

Crude Oil Price
Uniform Civil Code : 2029 पूर्वी 21 राज्यांत समान नागरी कायदा; अमित शहांचा मोठा निर्धार

भारत अन् ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम

भारत आणि आशियातील इतर देशांतील तेल कंपन्यांना आता सुरक्षित तेल आयात करण्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतील. भारतीय कंपन्यांसमोर आता दोनच पर्याय उरले आहेत, एक तर स्वस्त पण अत्यंत धोकादायक मार्गाने येणारे तेल खरेदी करून मोठी जोखीम पत्करणे, किंवा ऑस्ट्रेलिया/आफ्रिकेकडून सुरक्षित पण अत्यंत महागडे तेल खरेदी करणे.

तेलाचा भडका उडणार

मध्यपूर्वेतील हा संघर्ष असाच सुरू राहिला आणि सुरक्षित तेलाचे भाव वाढत गेले, तर येत्या काळात जागतिक स्तरावर इंधन महागाईचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक तेल बाजारात सध्या मोठी दुफळी निर्माण झाली आहे. जोखीम पत्करणारे व्यापारी स्वस्त तेल मिळवत आहेत, तर सुरक्षित पर्याय शोधणाऱ्या देशांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com