DeepSeek News : चीनने उडवली अमेरिकेची झोप, शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा भूकंप

stock market crashकंपनीचे म्हणणे आहे की ते अमेरिकेतील कोणत्याही मोठ्या एआय कंपनीच्या बरोबरीचे किंवा त्यापेक्षा चांगले काम हे मॉडेल करते.
DeepSeek News
DeepSeek NewsSarkarnama
Published on
Updated on

DeepSeek News : जवळ-जवळ दोन वर्षांपूर्वी, OpenAI ने ChatGPT लाँच केले. जेव्हा ओपनएआयने हा चॅटबॉट लाँच केला तेव्हा जगातील इतर देश या शर्यतीत मागे होते. विशेषतः चीन, जो तंत्रज्ञानाच्या बाबतीत सतत अमेरिकेला मागे टाकण्याचा प्रयत्न करत असतो. चॅटजीपीटीच्या लाँचिंगच्या वेळी, एआय शर्यतीत चीन फारसा दिसत नव्हता.

पण आता चीनच्या या डीपसीक कंपनीच्या नवीन एआय मॉडेलमुळे तंत्रज्ञानाच्या जगात धुमाकूळ घातला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते अमेरिकेतील कोणत्याही मोठ्या एआय कंपनीच्या बरोबरीचे किंवा त्यापेक्षा चांगले काम हे मॉडेल करते.

चॅटजीपीटीनंतर, गुगल, मेटा, अमेझॉननेही त्यांचे एआय चॅटबॉट्स लाँच केले आहेत. एआयच्या या शर्यतीत, अलिबाबा, बायडू सारख्या चिनी खेळाडूंनी अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यास सुरुवात केली. पण चीनमधून या शर्यतीत जे नाव पुढे आले आहे त्यामुळे अमेरिकेत धुमाकुळ घातला आहे.

DeepSeek News
Supreme Court Decision : सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश!; पोलिसांच्या 'त्या शॉर्टकट'ला बसणार लगाम

डीपसीकचा एआय असिस्टंट, डीपसीक-व्ही३ द्वारे समर्थित चॅटजीपीटीला मागे टाकत आहे. यामुळे काही अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांनी एआय गुंतवणुकीत अब्जावधी डॉलर्स गुंतवण्याच्या निर्णयावरही शंका उपस्थित केली आहे. यामुळे एनव्हीडियासह अनेक मोठ्या टेक कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे.

DeepSeek News
Arvind Kejriwal : दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांचे पंतप्रधान मोदींना पुन्हा एक पत्र...केली ही मोठी मागणी!

ओपन एआय आणि मेटाच्या सर्वात प्रगत मॉडेल्सच्या बरोबरीने

सिलिकॉन व्हॅलीच्या अधिकार्‍यांनी आणि अमेरिकन टेक कंपनीच्या अभियंत्यांनी ज्या दोन मॉडेल्सची प्रशंसा केली आहे. ते म्हणजे डीपसीक-व्ही३ आणि डीपसीक-आर. हे दोन्ही ओपनएआय आणि मेटाच्या सर्वात प्रगत मॉडेल्सच्या बरोबरीचे आहेत. डीपसीकचे म्हटले आहे की आमचे दोन्ही मॉडेल वापरण्यास स्वस्त आहेत. गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या DeepSeek-R1 चा वापर, कामाच्या आधारावर, OpenAI च्या o1 मॉडेलपेक्षा 20 ते 50 पट स्वस्त आहे. ही माहिती डीपसीकने त्यांच्या अधिकृत WeChat अकाउंटवरून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com