New Delhi : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीसाठी अजून जवळपास दोन महिन्यांचा वेळ असला तरी आम आदमी पक्षाने विरोधकांवर मात करण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी पक्षाने 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
निवडणुकीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. पण माजी मुख्यमंत्री व आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांना धक्के द्यायला सुरूवात केली आहे. आपने गुरूवारी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सहा उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसमधून पक्षात आलेले आहेत. त्यामुळे पहिल्याच यादीची चर्चा सुरू झाली आहे.
'आप'च्या पहिल्या यादीमध्ये भाजपच्या दोन माजी आमदारांचा समावेश आहे. या यादीमध्ये छतरपूर मतदारसंघातून ब्रम्ह सिंह तंवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते भाजपचे ज्येष्ठ नेते होते. काही दिवसांपूर्वीच केजरीवालांच्या उपस्थितीत आपमध्ये दाखल झाले आहेत. तर भाजपचे दुसरे दिग्गज नेते अनिल झा यांना किराडीमधून तिकीट दिले आहे. ते दोनदा आमदार होते.
भाजपचे तिसरे नेते बीबी त्यागी यांनीही काही दिवसांपूर्वी आपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना लक्ष्मीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विश्वासनगर मतदारसंघातून दीपक सिंघला आणि रोहतास नगर मतदारसंघातून सरिता सिंह आपच्या उमेदवार असतील. बदरपूर आणि सीलमपूर मतदारसंघातून अनुकमे राम सिंह आणि जुबैर चौधरी यांना तिकीट जाहीर झाले आहे.
भाजपप्रमाणे काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनाही आपने तिकीट दिले आहे. काँग्रेसमध्ये असताना पाचवेळा आमदार बनलेले मतीन अहमद यांचे पुत्र चौधरी जुबैर अहमद यांनी पत्नी आणि काँग्रेसच्या नगरसेवक शगुफ्ता चौधरी यांच्यासह आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेस नेते वीर सिंह धींगान यांना सीतामुरीतून तर माजी आमदार सुमेश शौकीन यांना मटियालामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
आपने घोंडा मतदारसंघातून गौरव शर्मा, करावल नगरमधून मनोज त्यागी यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आपने पहिली यादी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली आहे. राज्यात सध्या आपची सत्ता असून भाजपने सत्ता मिळवण्यासाठ ताकद लावली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारमधील गृहमंत्र्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच पुढील काही दिवसांत आपचे आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.