Congress : काय सांगता? बसपाचं नव्हे तर काँग्रेसचं 'निळं वादळ', प्रचारात होतेय नव्या ड्रेस कोडची चर्चा, नेत्यांच्या मुखी 'जय भीम'

Delhi Assembly Election 2025 National Congress On BSP Agenda: काँग्रेसच्या या नव्या निळ्या रंगाच्या पेहरावाला मायावतींनी'नौंटकी'म्हटलं आहे. तर आमच्या 'निळ्या वादळाचा'काँग्रेसने फॅशन शो केला आहे. त्यात काँग्रेसला यश येणार नाही, असे आकाश आनंद म्हणाले.
Delhi Assembly Election 2025
Delhi Assembly Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Delhi 23 Jan 2025: दलित वर्गाचा सर्वांगिण विकास हीच बहुजन समाजवादी पार्टीची ओळख, बसपाचा हाच अजेंडा आता काँग्रेस वापरत असल्याचे दिसते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्याची सुरवात झाली आहे.

काँग्रेसचे लोकसभेचे खासदार राहुल गांधी, राज्यसभेच्या खासदार प्रियंका गांधी आणि कार्यकर्ते सध्या निळ्या रंगाचा पेहराव करीत असल्याचे दिसते. बसपाच्या निळा रंगाचा वापर करण्यास सुरवात केलेल्या काँग्रेस नेत्यांच्या मुखी आता 'जय भीम'शब्दही ऐकू यायला लागले आहेत.

गेल्या काही निवडणुकांमध्ये अपयश आलेल्या बसपाच्या 'हत्ती'ची चाल सध्या मंदावली आहे. त्यामुळे काँग्रेसनं दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे, त्यामुळे बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या काँग्रेसच्या या नव्या रणनीतीला कशा पाहतात, हे लवकरच समजेल. 'निळा झेंडा आणि हत्ती निशाण, हीच बीएसपीची पहचान' अशी घोषणा बसपाचे कार्यकर्ते देतात, आता काँग्रेस आपले 'हात' 'निळ्या रंगात' बुडविले आहेत.

Delhi Assembly Election 2025
Delhi Assembly 2025: केजरीवालांना हरवण्यासाठी काँग्रेस-भाजपनं बांधला चंग; दिग्गज नेत्यांमधील लढती रंगणार

काँग्रेस देशभर दलित मतदारांवर नजर ठेवून आहे. जय बापू, जय भीम, जय संविधान मोहीमे सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पार्टीला सोबत घेऊन भाजप हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण, संविधान विरोधी आहे, असा आरोप करीत प्रचार केला होता. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ही रणनीती आखल्याचे दिसते.

काँग्रेसच्या प्रचारातील हा डाव मायावती यांनी यापूर्वीही पाहिला आहे. यामुळेच भाजप आणि समाजवादी पार्टीपेक्षा काँग्रेस त्यांच्या निशाण्यावर आहे. अनेक वर्षांपासून दलित मतदारांची नाळ ही बसपासोबत जुळलेली आहे. काँग्रेसच्या प्रचाराच्या नव्या 'जाळ्यात' किती दलित मतदार अडकतील, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

काँग्रेसच्या या नव्या निळ्या रंगाच्या पेहरावाला मायावतींनी'नौंटकी'म्हटलं आहे. तर आमच्या 'निळ्या वादळाचा'काँग्रेसने फॅशन शो केला आहे. त्यात काँग्रेसला यश येणार नाही, असे बसपाचे नेते आकाश आनंद यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश खेरीज बसपाची मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब,दिल्लीमध्ये ताकद आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक सपा आणि काँग्रेसने एकत्र लढली आहे. लोकसभेला बसपातील काही नेत्यांमुळे दलित मते सपाला मिळाली होती. पण दलित मतदार सपावर नाराज आहे. अशा मतदारांना भाजप नको असल्यामुळे काँग्रेस हाच त्यांच्यासमोर पर्याय असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com