
AAP serious allegations on Congress - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार असल्याचे दिसत आहे. कारण, या निवडणुकीतील पराभवाबाबत आम आदमी पार्टीकडून एक गंभीर आरोप आणि दावाच केला गेला आहे. आपने आरोप केला आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये संगनमत झाले होते. आम आदमी पार्टीचे नेते अनुराग धांडा यांनी काँग्रेसने भाजपच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आऱोप केला आहे. एवढंच नाहीतर त्यांनी काँग्रेसला ४४ कोटी रुपये रोख देणगी म्हणून मिळाल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला आहे.
आम आदमी पार्टीचे नेते अनुराग धांडा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्ष व भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये संगनमत झाले होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे की, काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाशी संगनमत करून दिल्ली निवडणुकी लढवत होता.
याशिवाय धांडा असेही म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेस भाजपशी संगनमत करून दिल्ली विधानसभा निवडणुका लढवत आहे का? यावर वारंवार चर्चा होतच होती. शिवाय आम्ही अनेकवेळा आरोप केला आहे की, भाजप आम आमदी पक्षाच्या नेत्यांच्या जागांना लक्ष्य करून काँग्रेसला निधी देत आहे. त्यांना भाजपने पैसे पुरवले होते जेणेकरून ते मतं विभाजीत करू शकतील व भाजपला फायदा होईल.
याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की, सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे निवडणुकीदरम्यान काय खर्च केले, त्यांना किती देणगी मिळाली याबद्दल कागदपत्रे सादर केली होती. त्यात खूप धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ज्यामुळे काँग्रेस भाजपच्या इशाऱ्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकी लढवत असल्याचा दावा आणखी दृढ होता?
खरंतर दिल्ली आणि देशभरातील सर्वांनाच माहीत होते की, या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि आप यांच्यातच होणार आहे. कारण, कोणतेही सर्वेक्षण किंवा कुणीही असं अजिबात म्हणत नव्हतं की काँग्रेसचं दिल्लीत काही अस्तित्व आहे, प्रत्येकजण म्हणत होतं की दिल्लीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. असंही आम आदमी पार्टीचे नेते धांडा यांनी स्पष्ट केले.
अनुराग धांडा यांनी असेही सांगितले की, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीत सरकार चालवणाऱ्या आम आदमी पार्टीला दोन हजार रुपयांची रोख देणगी मिळाली. केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपला देखील रोख देणगी मिळाली नाही. मात्र जिथे दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्वच नाही, ते कोणतीही जागा जिंकण्याची शक्यताही नव्हती, त्या पक्षाला तब्बल ४४ कोटी रुपयांची रोख देणगी मिळाली, मग ही देणगी कोणी दिली?
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.