'India' Opposition Parties Alliance meeting : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये अनेक बाबींवर मतभेद झाले होते. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत शंका होती. आता या बैठकीत केजरीवाल सहभागी होणार असल्याचे सांगतिले जात आहे.
केजरीवाल यांनी छत्तीसगड काँग्रेस (Congress) सरकारवर टीका केली होती. त्यावरून काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिले होते. दिल्लीतील सर्व सात लोकसभेच्या जागांसाठी पक्ष नेतृत्वाला जोरदार तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी विधान केले होते. त्यावर आम आदमी पक्षाने या विधानांवर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, काँग्रेसने दिल्लीत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल, तर 'इंडिया' आघाडीच्या युतीचा अर्थ काय? यानंतर या वादावरही पडदा पडला. त्यामुळे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. यानंतर बंगळुरूतील दुसऱ्या सभेत आघाडीचे 'इंडिया' असे नामकरण करण्यात आले. मुंबईतील होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप विरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान उभे करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील (Mumbai) बैठकीचे आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सर्व नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी बैठक होणार असून त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीमध्ये भाजप विरोधात विरोधकांचा एकच उमेदवार देण्याच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.