I.N.D.I.A. Mumbai Meeting : मुंबईत 'इंडिया'च्या 'लोगो'चे अनावरण; 'हे' नेते ठरवणार लोकसभेची रणनीती

BJP Opponent in India : राहुल गांधी देणार टिळक भवनला भेट
I.N.D.I.A.
I.N.D.I.A.Sarkarnama

Mumbai News : भाजपविरोधी भारतीय राष्ट्रीय विकासात्मक सर्वसमावेशक आघाडीची अर्थात 'इंडिया'ची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीत 'इंडिया' च्या लोगोचे अनावरण होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला आघाडीतील २६ हून पक्षांचे ८० हून अधिक नेते उपस्थित राहणार असल्याचेही बोलले जात आहे. या बैठकीत देशातील भाजपविरोधक काय महत्वाचे निर्णय घेणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

बिहारमधील पाटणा येथे झालेल्या भाजपविरोधकांच्या पहिल्या सभेत सर्व पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर बेंगळूरूतील दुसऱ्या सभेत आघाडीचे 'इंडिया' असे नामकरण करण्यात आले. आता होणाऱ्या मुंबईतील बैठकीत 'इंडिया'चा 'लोगो' आणि पुढील रणनीती स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. यामुळे या बैठकीकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

I.N.D.I.A.
Umesh Paricharak Mangalvedha : सोलापूरच्या राजकारणात नव्या चेहऱ्याचा उदय? उमेश परिचारकांना आमदार म्हणून शुभेच्छा !

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील उपनगरातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सर्व नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सभा होणार असून त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीची विरोधकांची काय स्ट्रॅटेजी ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

सोनिया गांधी ३१ ऑगस्टला येणार

'इंडिया'च्या यापू्र्वी झालेल्या दोन्ही बैठकांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. मुंबईतील बैठकीलाही त्या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह उपस्थित राहणार आहेत. गांधी ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजण्यापूर्वी मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.

I.N.D.I.A.
Onion Political Role : गल्ली ते दिल्ली, सर्वच राजकारण्यांचा कांद्यानं केला वांदा ! आतापर्यंत कुणाकुणाला रडवलं...

राहुल गांधी देणार काँग्रेस कार्यालयाला भेट

मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीला उपस्थित नेत्यांसाठी राज्य काँग्रेसनेही पुढाकार घेतला आहे. काँग्रेसच्या वतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे १ सप्टेंबरच्या दुपारीच्या स्नेहभोजनाची तयारी करण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी बैठकीनंतर १ सप्टेंबर रोजी मध्य मुंबईतील प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवनला भेट देण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com