Arvind Kejriwal : निवडणूक आयोगाच्या नोटीसला केजरीवाल यांचे उत्तर, म्हणाले...

Arvind Kejriwal Election Commission Notice Reply : निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस पाठवून पुरावे देण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाच्या या नोटिसला 14 पानांचे उत्तर सादर केले आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली निवडणुकीपूर्वी 'आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी हरियाणामधील भाजप सरकारवर यमुना नदीचे पाणी विषारी केल्याचा आरोप केला होता. या विधानावरून अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस पाठवून पुरावे देण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाच्या या नोटिसला 14 पानांचे उत्तर सादर केले आहे.

या नोटीसमध्ये केजरीवाल म्हणाले आहेत की, दिल्लीत हरियाणामधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल केलेली विधान हे हरियाणाहून येणाऱ्या पाण्यात असलेला दूषितपणा आणि विषारीपणा अधोरेखित करण्यासाठी केला गेला.

'दूषित पाणी आरोग्यासाठी गंभीर धोका आहे'

केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, हरियाणामधून मिळणारे पाणी अत्यंत दूषित आणि विषारी आहे. त्या पाण्यात इतकी अशुद्धता आहे की दिल्लीतील जलशुद्धीकरण संयंत्रे (WTPs) ते सुरक्षित मर्यादेत आणण्यासाठी त्यावर प्रक्रिया करू शकत नाहीत. जर असे विषारी पाणी लोकांना पिण्यास दिले तर त्यामुळे गंभीर आरोग्य धोके आणि मृत्यू देखील होऊ शकतो.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : निवडणुकीआधी केजरीवालांच्या अडचणीत वाढ? निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, विचारले हे पाच प्रश्न

अमोनियाची पातळी अनेक पटींनी वाढली

अरविंद केजरीवाल म्हणाले, "हरियाणाहून दिल्लीला (Delhi) येणाऱ्या पाण्यात अमोनियाची पातळी अनेक पटींनी वाढली आहे. ती ६.५-७ पीपीएमच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यांनी दिल्ली जल बोर्डाच्या सीईओंच्या पत्रातील त्या भागाकडेही लक्ष वेधले ज्यामध्ये म्हटले आहे की "वझिराबाद बॅरेजच्या वरच्या प्रवाहात काही प्रक्रिया न केलेले सांडपाणी किंवा औद्योगिक कचरा मिसळल्यामुळे यमुना नदीत अमोनियाचे प्रमाण वाढते."

निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात, अरविंद केजरीवाल यांनी पिण्याच्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यासाठी हाणीकारक आहे. त्यांच्या या विधानाने आचारसंहितेचे उल्लंघन झाले नाही. अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, "मी केलेल्या भाषणात बोललेले मुद्द्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

Arvind Kejriwal
Nitish Kumar Son Political Entry : नितीश कुमार यांचा मुलगा राजकारणात येणार का? अखेर उत्तर मिळाले, पक्षानेच मांडली भूमिका

काय आहे वाद?

27 जानेवारीला एका निवडणूक रॅलीत बोलतांना अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

केजरीवाल म्हणाले, “लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही. भाजप आपल्या घाणेरड्या राजकारणाने दिल्लीतील लोकांना तहानलेले ठेवू इच्छित आहे. ते हरियाणाहून पाठवल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळत आहेत.”

ते म्हणाले, "हे प्रदूषित पाणी इतके विषारी आहे की दिल्लीतील जलशुद्धीकरण केंद्रांद्वारे ते शुद्ध केले जाऊ शकत नाही. भाजप दिल्लीकरांची सामूहिक हत्या करू इच्छित आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही."

केजरीवालांच्या या वक्तव्यावर भाजप आणि काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांनी त्यांच्या दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर, निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आणि त्यांच्या विधानांच्या समर्थनार्थ तथ्यात्मक पुरावे देण्यास सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com