AAP News: काँग्रेसेच वरिष्ठ नेते मतीन अहमद यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. पाचवेळा आमदार राहिलेल्या मतीन अहमद यांना अरविंद केजरीवालांनी पक्षाचे सदस्यत्व दिले. दहा दिवस आधीच ब्रह्म सिंह तंवर हे भाजप सोडून आम आदमी पार्टीत सहभागी झाले होते. दिल्लीत पुढील वर्षाच्या सुरुवातीसच निवडणूक होणार आहे. याआधीच आम आदमी पार्टीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. यामुळे पक्षाची ताकद वाढत आहे आणि दिल्लीत सलग तिसऱ्यांदा आम आदमी पार्टीचे सरकार बनू शकते.
मतीन अहमद यांच्या आधी त्यांचे पुत्र जुबैर आणि सूनबाई शगुफ्ता यांनी काँग्रेस सोडून आम आदमी पार्टीत (AAP ) प्रवेश केला होता. आता मतीन अहमदही 1993 ते 2013 पर्यंत सीलपूर मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार बनले आहेत.
मतीन अहमद दोनदा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष राहिले आहेत. वर्ष 2004मध्ये हारून यूसुफ यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना ही जबाबदारी मिळाली होती. यानंतर 2009मध्ये देखील त्यांना दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं होतं. मतीन अहमद काँग्रेस (Congress) सरकारमध्ये दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत.
त्यांनी 2013मध्ये आम आदमी पार्टीने सीलमपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर पुढील निवडणुकीतही या मतदारसंघातून विजयी मिळवण्यात यश आलं. आता मतीन अहमद यांचाच पक्षात प्रवेश झाल्याने त्या भागात आम आदमी पार्टीची ताकद आणखी वाढली आहे. आता ही जागा पुन्हा एकदा आम आमदी पार्टीच्या ताब्यात जाऊ शकते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.