Arvind Kejriwal : जेलमध्ये असलेल्या केजरीवालांना दोन दिवसांत दोन धक्के

Lok Sabha Election Result Delhi Liquor Scam Case Arvind Kejriwal Bail Denied : अरविंद केजरीवाल यांनी तब्येतीचे कारण ते दिल्लीतील कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला झटका बसला आहे. पक्षाला पंजाबमध्ये सत्ता असून केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जेलमध्ये असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचार करूनही पक्षाला प्रभाव पाडता आला नाही. आता दिल्लीतील कोर्टाने लोकसभेच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना दुसरा धक्का दिला आहे.

केजरीवालांना दोन दिवसांत दोन धक्के बसले आहेत. बुधवारी दिल्लीतील राउज अव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांना अंतरिम जामीन नाकारला आहे. तसेच त्यांची न्यायालयीन कोठडीही 19 जूनपर्यंत वाढवली. विशेष सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा निकाल दिला.

जामीन नाकारताना कोर्टाने केजरीवालांच्या आवश्यक आरोग्य तपासण्या करण्याचे आदेशही दिले आहेत. केजरीवालांनी आरोग्याचे कारण देत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतरिम जामीनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी कोर्टात केली होती.

Arvind Kejriwal
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

ईडीने केजरीवालांच्या जामीनाला मुदतवाढ देण्यास जोरदार विरोध केला होता. देशातील निवडणुकीत केजरीवालांनी प्रचार केला. पण जेलमध्ये परत येईपर्यंत ते आजारी पडले नाहीत, असे म्हणत ईडीने जामीन नाकारण्याची विनंती केली होती. ही विनंती कोर्टाने मान्य केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने दिल्ली, गुजरातमध्ये आघाडी केली होती. पण पंजाबमध्ये दोन्ही पक्ष विरोधात लढले. दिल्लीसह गुजरातमध्ये आपला एकही जागा मिळाली नाही. तर पंजाबमध्ये केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी आपचे खासदार पहिल्यांदाच लोकसभेच्या सभागृहात दिसणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com