Medha Patkar : मेधा पाटकर यांना पाच महिन्यांची शिक्षा; राज्यपालांच्या बाजूने कोर्टाचा निकाल

Delhi Saket Court Defamation Case VK Saxena : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्ली येथील कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता.
Medha Patkar, VK Saxena
Medha Patkar, VK SaxenaSarkarnama

New Delhi : नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतील कोर्टाने पाच महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. मानहानीच्या एका खटल्यामध्ये कोर्टाने ही शिक्षा सुनावली असून संबंधितांना दहा लाखांची भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या बाजूने दिल्लीतील साकेत कोर्टाने हा निकाल दिला आहे. त्यांनी पाटकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर कोर्टाने सोमवारी निकाल सुनावला. त्यानुसार पाटकर यामध्ये दोषी ठरल्या असून त्यांना पाच महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Medha Patkar, VK Saxena
Parliament Session Live : गडकरींचे नाव घेत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; काय घडलं लोकसभेत?

दरम्यान, कोर्टाने एक ऑगस्टपर्यंत शिक्षेला स्थगिती दिली आहे. या काळात मेधा पाटकर यांना शिक्षेविरोधात अपील करता येणार आहे. कोर्टाच्या निकालानंतर बोलताना पाटकर म्हणाल्या, सत्य कधीच पराजित होत नाही. आम्ही कुणाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही केवळ आमचे काम केले. आम्ही कोर्टाच्या निकालाला आव्हान देऊ.

सक्सेना यांनी 2001 मध्ये खटला दाखल केला होता. त्यावेळी ते नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हील लिबर्टीज या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष होते. त्यावेळी पाटकर यांनी प्रसिध्द केलेल्या एका पत्रकामध्ये आपल्याविषयी बदनामीकारक मजकूर असल्याचे सक्सेना यांनी म्हटले होते.

Medha Patkar, VK Saxena
Parliament Session Live : राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणाने हंगामा; मोदींनाही उभं राहावं लागलं...

सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलनाला 40 हजार रुपयांचा चेक दिला होता. पण चेक बाऊंस झाला. बँकेकडे चौकशी केल्यानंतर खाते अस्तित्वात नसल्याचे समजले. लालभाई ग्रुपकडून हा चेक आला होता. लालभाई ग्रुप आणि सक्सेना यांचे काय कनेक्शन आहे, असे पाटकर यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले होते.

या प्रसिध्दीपत्रकाविरोधात सक्सेना यांनी अहमदाबाद येथील स्थानिक कोर्टात 2001 मध्ये खटला दाखल केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 2002 मध्ये हा खटला साकेत कोर्टात गेला. तब्बल 23 वर्षांनी या खटल्याचा निकाल आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com