Delhi Election 2025: दिल्लीत गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले उमेदवार रिंगणात; आप 'आघाडीवर'; भाजप, काँग्रेसचा क्रमांक किती?

Candidates with criminal background:दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या 12 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यात पाच पेक्षा अधिक वर्ष कारावास झालेल्या उमेदवारही सामील आहेत.
Delhi Assembly Election 2025
Delhi Assembly Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभेची निवडणूक येत्या 5 फेब्रुवारी रोजी आहे. 72 जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जावरुन किती उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, याची माहिती मिळाली आहे. 19 टक्के उमेदवारांनी याबाबतची माहिती दिली आहे.

एडीआरने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 20 टक्के उमेदवारांनी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. एडीआरच्या अहवालानुसार गेल्या विधानसभा निवडणुकीत 672 उमेदवारांनी ही माहिती दिली होती, या निवडणुकीत 699 झाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या 12 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यात पाच पेक्षा अधिक वर्ष कारावास झालेल्या उमेदवारही सामील आहेत. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण 15 टक्के होते. निवडणूक अर्जात उमेदवारांनी खून,खूनाचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचार याविषयीची माहिती दिली आहे.

Delhi Assembly Election 2025
Sanjay Raut: राऊतांची पाठ फिरताच ठाकरे सेनेला पडलं खिंडार; 500 कार्यकर्त्यांचा 'जय महाराष्ट्र'

महिलाच्या संबधीत असलेल्या गुन्ह्याच्याबाबतीत विचार केला तर या निवडणुकीत 13 टक्के उमेदवारांवर अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन उमेदवारांवर खूनाचा आरोप आहे. तर पाच उमेदवारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

आम आदमी पक्षाचे 63 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यात 41 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. काँग्रेसच्या टक्के उमेदवारांनी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली आहे. यातील 19 टक्के उमेदवारांवर गंभीर आरोप आहेत. भारतीय जनता पार्टीच्या 29 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. यातील 13 टक्के उमेदवारावरील आरोप गंभीर आहेत.

Delhi Assembly Election 2025
Walmik Karad: फरार असताना वाल्मिकने धनंजय मुंडे अन् स्वतःच्या नावावर असलेल्या मालमत्ता ट्रान्सफर केल्या?

2015 आणि 2020 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अन्य पक्षापेक्षा सक्रिय नव्हती, पण आता होत असलेल्या विधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. सत्तेत पुन्हा येणार, असा विश्वास काँग्रेसला आहे. आप आदमी पार्टी आपल्या ताब्यातील दिल्ली वाचवण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे 27 वर्षांचा सत्तेचा वनवास संपविण्यासाठी काँग्रेससमोर मोठ आवाहन आहे. अशातच काँग्रेस आपले अस्तित्व वाचवण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यासाठी डावपेच आखत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com