Walmik Karad: फरार असताना वाल्मिकने धनंजय मुंडे अन् स्वतःच्या नावावर असलेल्या मालमत्ता ट्रान्सफर केल्या?

Walmik Karad Property Transfer : वाल्मिक कराड हा मुंडे यांचा सावलीसारखा काम करणारा उजवा हात आहे. अनेक मालमत्ता या दोघांच्या एकत्रित आहेत.
Walmik Karad-Dhananjay Munde
Walmik Karad-Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. एकीकडे या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असून त्याच्यामागे धनंजय मुंडे असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करीत आहेत.

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी देखील मागणी सातत्याने होत आहे. आता पुन्हा एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत मागणी केली आहे.

पुणे दौऱ्यावर असलेल्या अंबादास दानवे यांनी विविध विषयावर माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दानवे म्हणाले, मंत्रिपदाच्या कार्यकाळातील धनंजय मुंडे यांचे कामकाज वाल्मिक कराड हाच सांभाळत होता.

Walmik Karad-Dhananjay Munde
Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांमध्ये 'डिनर डिप्लोमसी'; 'स्थानिक' निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

वाल्मिक कराड हा मुंडे यांचा सावलीसारखा काम करणारा उजवा हात आहे. अनेक मालमत्ता या दोघांच्या एकत्रित आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या काळामध्ये कराड हा फरार होता त्यावेळेस त्यांनी या संपत्ती वेगवेगळ्या नावाने ट्रान्सफर केल्या असल्याचा दावा दानवे यांनी केला.

धनंजय मुंडे आणि कराड याचे संबंध असल्याचे स्पष्ट असताना देखील सरकार याबाबतचे पुरावे मागत आहे. कराड आणि मुंडे हे सावली सारखे एकमेकांसोबत असताना असताना देखील सरकार राजीनामा न घेत धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे. मात्र नैतिकदृश्य धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने घेणे आवश्यक आहे.

Walmik Karad-Dhananjay Munde
Walmik Karad : 'वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा, जेलमध्ये दिमतीला सात हवालदार', शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

सरकार मधील अनेक जण मुंडे यांची बाजू घेत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, सरकारला अजून कुठले पुरावे पाहिजे. धनंजय मुंडे आणि कराड एक आहे. या बाबत विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे, असे दानवे म्हणाले.

बीडची पोलिस यंत्रणा असून नसल्यासारखी आहे.कोणी मुक्तपणे काम करीत नाही. अधिकारी पण बीडला काम करीत नाही, मुंडे आणि कराड यांचेच बगलबच्चे काम करीत आहेत, असा आरोप दानवेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com