Congress News: काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट; पक्षश्रेष्ठी घेणार मोठा निर्णय

Congress leadership change soon big decision by party high command:निवडणुकीच्या काळात विरोधकांवर टीका करताना काय काळजी घ्यायची यांचा सल्ला पक्षश्रेष्ठींकडून देण्यात येणार आहे. वादग्रस्त विधानं करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तंबी देण्यात येणार आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi: सलग तीन विधानसभा निवडणुकीत आपले खातेही उघडू न शकलेल्या काँग्रेसला आता उशीरा जाग आली आहे. काँग्रेस लवकरच बूथ कमिटी ते वरिष्ठ पदाधिकारी यांच्यात खांदेपालट करणार आहे.

दिल्ली विधासभेत सपाटून मार खाल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी आत्मचिंतन करीत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पक्षाअंतर्गत विविध बदल करण्यासाठी बैठका सुरु आहेत.

फेररचनेत बदल करताना युवा कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहे. पक्षातील विविध सेल जे सध्या बंद आहेत, त्यांना सक्रिय करण्यात येणार आहे. ब्लॅाक कमेटी ते जिल्हा स्तरावर मोठे करण्यात येणार आहे.

Congress News
ZP Election : झेड.पी. इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फिरणार? मतदारसंघ पुनर्रचना होणार...

निवडणुकीच्या काळात विरोधकांवर टीका करताना काय काळजी घ्यायची यांचा सल्ला पक्षश्रेष्ठींकडून देण्यात येणार आहे. वादग्रस्त विधान केल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होते, त्यामुळे अशी विधानं करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तंबी देण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित आणि चांदणी चौक विधानसभेचे उमेदवार मुदित अग्रवाल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकामध्ये असे प्रकार टाळण्यासाठी पक्षाने नियमावली केली आहे. त्यांची अंमलबजावणी लवकरच सुरु होणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला असला तरी अनेक जागांवर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढली आहे. संदीप दीक्षित, अलका लांबा, कृष्णा तीरथ, मुदित अग्रवाल, हारून यूसुफ आणि राजेश लिलोठिया यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

Congress News
Rahul Solapurkar Controversy: राहुल सोलापुरकरांच्या घराबाहेर वंचित अन् RPIचं आंदोलन; कार्यक्रर्ते आक्रमक

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संदीप दीक्षित यांची लढत झाली. यात त्यांना फक्त 4 हजार 568 मते मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यात जागेवर भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा 4 हजार 089 मतांनी पराभव करुन ते विजयी ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com