NCP Delhi Elections : महाराष्ट्रातील विजयाने काॅन्फिडन्स वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मिशन दिल्ली'; पहिल्याच यादीत 11 जणांना उमेदवारी

NCP Delhi Vidhan Sabha ELection Candidate Announcement : निवडणूक तारखा जाहीर होण्याआधीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे.
Delhi Vidhan Sabha ELection
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Delhi Vidhan Sabha ELection : दिल्ली निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक तारखा जाहीर होण्याआधीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 11 उमेदवारांची नावे आहेत.

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव (Devendra Yadav) यांच्या विरोधात पक्षाने मुलायम सिंह यांना बदलीमधून तिकीट दिले आहे. याशिवाय बुरारीमधून रतन त्यागी, चांदनी चौकातून खालिद उर रहमान, बल्ली मारनमधून मोहम्मद हारुण आणि ओखलामधून इम्रान सैफी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. छतरपूरमधून नरेंद्र तंवर, लक्ष्मी नगरमधून नमाहा, गोकुळपुरीतून जगदीश भगत, मंगोलपुरीतून खेम चंद, सीमापुरीतून राजेश लोहिया आणि संगम विहारमधून कमर अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Delhi Vidhan Sabha Election
Delhi Vidhan Sabha ElectionSarkarnama

दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा असून फेब्रुवारीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास बराच कालावधी आहे. पण आधीच पक्षाने सर्व उमेदवार जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या (NCP) यादीत 4 मुस्लिम उमेदवारांनाही स्थान देण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी पक्षाने (AAP) 70 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर काँग्रेसने आतापर्यंत पहिल्या यादीत 47 जागांसाठी तर नुकतीच जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत 26 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्याचबरोबर भाजपही आपल्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करू शकते.

Delhi Vidhan Sabha ELection
Hasan Mushrif : धनंजय मुंडेंचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का? हसन मुश्रीफांनी जाहीर केली भूमिका

काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

नुकतीच काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 26 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. नावे जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक झाली. या बैठकीत 35 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. मात्र, 26 जागांवर केवळ उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित 9 जागा सध्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com