Arvind Kejriwal News : प्रचारासाठी केजरीवालांना मिळणार जामीन? सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान...

Supreme Court News : केजरीवालांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोर्टाने अंतरिम जामीनाबाबत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे.
Supreme Court, Arvind Kejriwal
Supreme Court, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केजरीवालांनी अटकेविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात थेट केजरीवालांच्या अंतरिम जामिनाचा मुद्दा उपस्थित केला. केजरीवालांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीलांना अंतरिम जामीन देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे विधान कोर्टाने केले आहे.

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाबाबत दोन्ही बाजूच्या वकिलांनी पुढील सुनावणीवेळी तयारीनिशी यावे, असे म्हटले आहे. आम्ही जामीन देणार की नाही, याबाबत काही बोलू शकत नाही. पण जामीन मिळाला तर कोणत्या अटी असू शकतात, याबाबत बाजू मांडण्यासह कोर्टाने सांगितले आहे. (Latest Marathi News)

Supreme Court, Arvind Kejriwal
Supreme Court News : …निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही; कोर्टानं का घेतलं लालू अन् राहुल गांधींचं नाव?

केजरीवालांच्या जामीनावर मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. अटकेविरोधातील सुनावणी लांबणार असेल तर आम्ही निवडणूक (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी केजरीवालांच्या अंतिम जामीनावर विचार करू, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या विधानामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने केजरीवालांची अटकेविरोधातील याचिका मागील महिन्यांत फेटाळून लावली आहे. त्यानंतर केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून कोर्टात केजरीवालांची बाजू मांडली जात आहे. मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने केलेली अटक योग्यच असल्याचा निकाल हायकोर्टाने दिला आहे.

दिल्लीमध्ये सात मतदारसंघ आहेत. सहाव्या टप्प्यात म्हणजे 25 मेला मतदान होणार आहे. राज्यात काँग्रेस आणि आपची आघाडी झाली असून आप चार जागांवर लढत आहे. मात्र, केजरीवाल तुरूंगात असल्याने सध्या आम आदमी पक्षाला प्रचारात त्यांची उणीव जाणवत आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केजरीवालांना जामीन दिल्यास आपला मोठा दिलासा मिळू शकते. तसेच निवडणुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Supreme Court, Arvind Kejriwal
Lok Sabha Election 2024 : …ही तर काँग्रेसची रणनीती, अजून काही चाली बाकी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com