Lok Sabha Election 2024 : …ही तर काँग्रेसची रणनीती, अजून काही चाली बाकी!

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांना अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण यामागे काँग्रेसची चाल असल्याचे स्पष्ट संकेत जयराम रमेश यांनी दिले आहेत.
Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Rahul Gandhi, Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसने राहुल गांधी यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) तर के. एल. शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिल्यानंतर तर्कवितर्क लढवले जात आहेत. पराभवाच्या भीतीने राहुल हे अमेठीतून पळून गेल्याची टीका भाजपकडून केली जात आहे.

मात्र, या निर्णयामागे काही डावपेच असल्याचे संकेत काँग्रेसकडून दिले जात आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीच याबाबत स्पष्ट करत प्रियांका गांधी यांच्या संसदेतील प्रवेशाबाबत मोठं विधान केलं आहे.

राहुल (Rahul Gandhi) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयराम रमेश यांनी अनेक मुद्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, राहुल यांना रायबरेलीतून उमेदवारीवरून अनेकांची अनेक मतं आहेत. पण ते राजकारण आणि बुध्दिबळाचे एक कसलेले खेळाडू असून विचारपुर्वकच चाल चालतात. पक्षाच्या नेतृत्वाने खूप विचार करूनच एका मोठ्या रणनीतीनुसार हा निर्णय घेतला आहे, असे जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
PM Narendra Modi News : राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळताच मोदींनी दिलं आव्हान...

रायबरेली केवळ सोनिया गांधींची (Sonia Gandhi) नसून इंदिरा गांधीहीचीही होती. हा वारसा नाही, जबाबादारी आहे, कर्तव्य आहे. केवळ रायबरेली, अमेठीच नाही तर उत्तर ते दक्षिण संपूण देश गांधी परिवाराचा गड आहे.

राहुल हे तीन वेळा उत्तर प्रदेशातून तर एकदा केरळमधून खासदार झाले आहेत. पण मोदी दक्षिणेत जाण्याची हिंमत का करत नाहीत? अमेठीमध्ये काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता भाजपचा भ्रम तोडेल, असे जयराम रमेश म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रियांका गांधींसाठी पोटनिवडणूक?

प्रियांका गांधींना (Priyanka Gandhi) रायबरेलीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याविषयी बोलताना जयराम रमेश यांनी सूचक संकेत दिले आहेत. ते म्हणाले, प्रियांकाजी धुवांधार प्रचार करत आहेत.

त्या एकट्या नरेंद्र मोदींच्या प्रत्येक कोट्या प्रचाराचे उत्तर सत्याने देत त्यांची बोलती बंद करत आहेत. त्यामुळे त्यांना एकाच मतदारसंघात सीमित न ठेवणे गरजेचे होते. त्या कोणतीही पोटनिवडणूक लढवून संसदेत पोहचतील, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.

स्मृती इराणी यांची ती ओळखही जाईल

स्मृती इराणी (Smriti Irani) यांची ओळख केवळ राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीत निवडणूक लढतात, एवढीच आहे. आता ही ओळखही पुसणार आहे. व्यर्थ भाषणबाजी न करता इराणींनी स्थानिक विकासावर उत्तर द्यावे, बंद करण्यात आलेले रुग्णालय, स्टील प्लँट आणि आयआयआयटी वर उत्तर द्यावे. बुध्दिबळाच्या काही चाली बाकी आहेत, थोडी वाट पाहा, असे म्हणत जयराम रमेश यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Congress News: अखेर ठरलं; राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार, अमेठीतून केएल शर्मा मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com