Sanjay Pandey Grant Bail : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये कथित फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
Sanjay Pandey
Sanjay Pandeysarkarnama
Published on
Updated on

Sanjay Pandey : राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस (Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी अटींसह जामीन मंजूर केला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्याचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह त्यांच्या आई संतोष पांडे व मुलगा अरमान पांडे यांच्यावर सीबीआयने नुकताच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयानेही  (ED)  पांडे यांच्यावर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला. याशिवाय ईडीने एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना याच प्रकरणात अटक केली होती.

Sanjay Pandey
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

ईडीने पाच जुलै रोजी पांडे यांची एका प्रकरणात चौकशी केली होती. आता ईडीने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने शुक्रवारी पांडे यांच्या घरी तसेच एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण आणि रवी नरेन यांच्यासह अन्य काही जणांच्या घरांवर छापेमारी केली होती. देशात मुंबई, पुण्यासह जवळपास 18 ठिकाणी ही कारवाई झाली होती. यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले.

काय आहे प्रकरण?

सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या चित्रा रामकृष्ण यांच्यासह एनएसईमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. एनएसईमधील अनियमिततेबाबत 2015 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू झाल्यानंतर सीबीआयने 2018 मध्ये पहिला गुन्हा दाखल केल्या. या गुन्ह्यात मार्च महिन्यात रामकृष्ण यांच्यासह अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये संजय पांडे यांच्या कंपनीचं नाव पुढं आलं. सीबीआयने त्याची चौकशी सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले.

2009 ते 2017 या कालावधीत एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या फोनचे बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याप्रकरणी शुक्रवारी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. रामकृष्ण प्रकरणातील हा दुसरा गुन्हा आहे. एनएसईचे माजी एमडी रवी नारायण यांच्या विरोधातही ही कारवाई सुरू करण्यात आली होती. सीबीआयने देशभरात संजय पांडे यांच्याशी संबंधित 18 ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. मुंबईत आठ, पुण्यात दोन, चंदीगड, लखनऊ आणि कोटा येथे प्रत्येकी एक आणि दिल्ली एनसीआरमध्ये पाच ठिकाणी छापे टाकले होते.

संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला आणि आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली. मात्र त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यांना पुन्हा सेवेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांनी 2006 मध्ये कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला आपल्या कंपनीत संचालकपद दिले.

संजय पांडे यांच्या या कंपनीकडे एनएसईचे सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षणाचे कंत्राट देण्यात आले होते. 2010 ते 2015 या कालावधीत लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या आयसेक सर्व्हिसेसच्या लेखापरीक्षण अहवालात एनएसईमधील गैरव्यवहार का उघड झाला नाही, याबाबत ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com