New Delhi News : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी ईडीने त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्याची मागणी कोर्टाकडे केली. केजरीवाल हेच घोटाळ्याचे किंगपन असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला. साऊथ लॉबीकडून केजरीवालांनी लाच घेतली. त्यातील 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्यात निवडणुकीसाठी पाठवण्यात आल्याचा मोठा दावाही ईडीने केला आहे.
केजरीवालांना आज दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्या कोठडीची मागणी करताना ईडीने (ED) अनेक मोठे दावे केले आहेत. कथित मद्य घोटाळ्याचे केजरीवाल हेच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीने केला आहे. हे धोरण तयार करण्यात थेट त्यांचा सहभाग होता. लाच घेण्यासाठी त्यांनी काही ठराविक लोकांना मदत केली. त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर गोव्यातील निवडणुकीमध्ये (Election) आपसाठी केल्याचा आरोपही ईडीने केला आहे.
साऊथ ग्रुपकडून आपला 45 कोटी मिळाले होते. हवालामार्फत हे पैसे गोव्याला पाठवण्यात आले. मनीष सिसोदियांनी (Manish Sisodia) विजय नायरला केजरीवालांच्या घरी बोलावले आणि धोरणाशी संबंधित कागदपत्रे दिली. नायर हा केजरीवाल आणि के. कविता यांच्यातील दुवा होता. हे दोघे एकमेकांच्या सतत संपर्कात होते. कविता यांनी आपला 300 कोटी दिले होते. केजरीवालांचे वडील दिल्लीतील मद्य व्यवसायातील प्रमुख चेहरा बनावेत, असे त्यांना वाटत होते, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ईडीने केलेल्या आरोपांचे पुरावे असल्याचा दावाही केला आहे. आरोपी विजय नायर हा केजरीवालांसाठीच काम करत होता. तो केजरीवालांच्या घराजवळ राहत होता. तो एजंटसारखा काम करत होता. केजरीवालांनी दक्षिण लॉबीकडे लाच मागितल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा ईडीने केला आहे. हा केवळ शंभर कोटींच्या लाचेचा गुन्हा नाही तर त्या माध्यमातून मिळालेला फायदाही मोठा आहे, असे ईडीने म्हटले आहे. आम आदमी पक्षाला याचा फायदा झाला आहे. ही एक कंपनी आहे. यामध्ये सहभागी असलेला प्रत्येकजण यासाठी जबाबदार आहे. तेही गुन्हेगार आहेत, असे ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.
ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टात केजरीवालांची बाजू मांडली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आले आहे. पहिल्यांदाच पक्षाच्या चार नेत्यांना अटक करण्यात आली आहे. याचा अर्थ मतदानापूर्वीच तुमच्या हातात निकाल आला आहे. केजरीवालांच्या सहभागाबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांना अटक करण्याची काहीच गरज नव्हती, अशी बाजू सिंघवी यांनी मांडली. अद्याप न्यायालयाकडून यावर निकाल देण्यात आलेला नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.