CM Sawant ON CM Kejriwal: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला 'आयआयटीयन'आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील फरक...

Delhi Lok Sabha Election 2024: गोवा,पंजाब आणि गुजरातच्या निवडणुकीत दिल्लीच्या कथित अबकारी धोरणाच्या घोटाळ्यातील पैसा वापरल्याचा आरोपही सावंत यांनी केला.
CM Sawant ON CM Kejriwal
CM Sawant ON CM KejriwalSarkarnama
Published on
Updated on

कथित अबकारी घोटाळा आणि स्वाती मालिवाल प्रकरणावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघात केला आहे. आपच्या धोरणांसह नेत्यांच्या भ्रष्टाचारावर सावंत यांनी भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सावंत तीन दिवसापासून दिल्लीत आहेत.

सावंत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गोवा,पंजाब आणि गुजरातच्या निवडणुकीत दिल्लीच्या कथित अबकारी धोरणाच्या घोटाळ्यातील पैसा वापरल्याचा आरोपही सावंत यांनी केला. देशात पुन्हा एनडीए आघाडीचे सरकार येत असल्याचा दावा सावंत यांनी केला.

CM Sawant ON CM Kejriwal
Subodh Savji News: निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेल, म्हणणारे माजी मंत्री अडचणीत; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर आणि अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षणाचा संदर्भ देत दोघांमध्ये काय फरक आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. केजरीवाल आणि पर्रीकर यांचा आयआयटीमधून शिक्षणाचा संदर्भ देत दोघांमध्ये काय फरक आहे, हे सांगत सावंतानी केजरीवालांना चिमटा काढला.

"पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत देश आणि राज्यासाठी काम केले. तर, केजरीवाल पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात देखील गेलेले मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळतात,' असा टोला सावंतांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सावंत म्हणाले,"भारतीय जनता पक्षासाठी देश प्रथम नंतर पक्ष आणि त्यानंतर मी असे धोरण आहे. तर, केजरीवालांसाठी पैसा प्रथम त्यानंतर स्वत: आणि शेवटी राज्य किंवा देश आहे. यासाठी ते काम करतात म्हणून ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत. पर्रीकर एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांचे शिक्षण आयआयटीमधून झाले, त्यांच्याकडे बघा. केजरीवाल पण एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते देखील स्वत:ला आयआयटीयन असल्याचे सांगतात, पण भ्रष्टाचारात गुंतले आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com