Udit Prakash Rai : IAS चा कारनामा; मुख्य सचिवांच्या बनावट सह्या, राज्यपालांकडून खटला चालवण्यास मंजूरी  

Delhi LG VK Saxena : उदित प्रकाश राय यांनी मुख्य सचिवांच्या बनावट सह्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Udit Prakash Rai
Udit Prakash RaiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस बनलेल्या पूजा खेडकरचे प्रकरणा ताजे असतानाच एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याचे कारनामे समोर आले आहेत. त्यांनी आपल्या वार्षिक अहवालावर थेट मुख्य आयुक्तांच्या बनावट सह्या केल्याचे समोर आले आहे.

दिल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. आयएएस अधिकारी उदित प्रकाश राय यांच्यावर हे आरोप लावण्यात आले असून नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी त्यांच्याविरोधात खटला चालवण्यास मंजूरी दिली आहे. उदित राय हे ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत दिल्लीचे शिक्षण संचालक होते.

Udit Prakash Rai
Manish Sisodia : मनीष सिसोदियांसाठी ‘गुड न्यूज’; सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा

उदित प्रकाश राय यांनी दिल्ली आणि अंदमान व निकोबार प्रशासनात कार्यरत असताना आपल्या अप्रायझल परफॉर्मंस एन्युअल रिपोर्टसवर संबंधित राज्यातील मुख्य सचिवांच्या बनावट सह्या केल्या होत्या, असा आरोप आहे. याप्रकरणी सक्सेना यांनी गृह मंत्रालायाकडे पुढील कारवाई करण्याची शिफारस केली आहे. दिल्ली पोलिसांनी राय यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

राय यांना भ्रष्टाचारप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली कृषी विपणन बोर्डाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी एका अभियंत्याकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. दिल्ली जल बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी जलविहार येथे पाच कोटींच्या शासकीय निवासासाठी हेरिटेज बांधकाम पाडल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

Udit Prakash Rai
Narendra Modi and Muhammad Yunus : मोहम्मद यूनुस यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा अन् बांगलादेशातील हिंदूंच्या सुरेक्षेचा मुद्दाही मांडला!

अनेकदा केल्या बनावट सह्या

राय यांनी केवळ दोन मुख्य सचिवांच्याच बनावट सह्या केल्या नाहीत तर विविध पदांवर कार्यरत असताना इतर अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालाववधीत अंदमान व निकोबार प्रशासनात मुख्य सचिवांसह अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याचीही बनावट सही केली होती. एप्रिल 2019 ते जुलै 2019 या कालावधीत जिल्हाधिकारी होते. या कालावधीत त्यांनी महसूल विभागाचे प३धान सचिवांची बनावट सही केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com