
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता मुख्यंमत्री कोण, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम गुरुवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रमाची तयारी रामलीला मैदानावर जय्यत सुरू आहे.
हरियाणा, गोवा, कर्नाटक आणि त्रिपुरा, आसाम आणि मध्य प्रदेशमधील निवडणुका जिंकल्यानंतर अशा काही राज्यांमध्ये मोदी-शाह या जोडीने धक्कातंत्राचा वापर करत भल्याभल्यांना चकवत भाजपने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे निवडले आहेत.
यामागे त्यांची रणनीती म्हणा की दुरदृष्टी की आणखी काही. पण त्यांची प्रत्येक निवड यशस्वी ठरली आहे. आता दिल्लीतही ते याच कुटनीतीचा अवलंब करून नव्या चेहऱ्याला संधी देणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक आमदार आहेत, परंतु अंतिम निर्णय बुधवारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. यानंतर, भाजप उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेईल आणि दिल्लीत सरकार स्थापनेचा प्रस्ताव सादर केला जाईल. राज्यपालांना नवनिर्वाचित भाजप (BJP) आमदारांची यादी देखील देण्यात येईल. यानंतर उपराज्यपाल हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवतील.
भाजप सूत्रांचे म्हणणे आहे की केंद्रीय पथकातून नियुक्त केलेले निरीक्षक विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहतील आणि ते या प्रस्तावाची माहिती हायकमांडला देतील. तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री देखील घेतली जाईल. मुख्यमंत्रीपदासाठी प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता, शिखा राय, रवींद्र इंद्रराज सिंह आणि कैलाश गंगवाल यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
असेही म्हटले जात आहे की भाजप नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री बनवून लोकांना आश्चर्यचकित करू शकते. राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही या प्रकारचा ट्रेंड दिसून आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.