Rahul Gandhi News : राहुल गांधींना पुण्यातील केसमध्ये मोठा दिलासा; 'समन्स ट्रायल'साठी कोर्टात अर्ज...

Pune Court order Veer Savarkar Defamation Case : वीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्यातील कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांना प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कोर्टात सुनावणीला हजर न राहण्यासाठी कायमस्वरुपी मुभा देण्यात आली आहे.

पुण्यातील कोर्टाने मंगळवारी राहुल गांधींना दिलासा दिला. राहुल गांधींची उच्चस्तरीय सुरक्षा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते असल्याचे सांगत कोर्टाकडून ही सवलत देण्यात आली आहे. राहुल यांच्यावर देशभरात अनेक ठिकाणी विविध प्रकरणात मानहानीची दावे दाखल करण्यात आले आहे.

Rahul Gandhi
Gujarat Local Body Elections: दिल्लीनंतर भाजपनं काँग्रेसला या राज्यात लोळवलं; 15 नगरपालिकांवर वर्चस्व

गुजरातमधील एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने खासदारकी गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली होती. पुण्यातील प्रकरणात विशेष न्यायालयामध्ये वकील मिलिंद पवार यांच्यामार्फत उपस्थित राहण्याबाबत मुभा देण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. 

मिलिंद पवार यांच्यामार्फत कोर्टात आणखी एक अर्ज दाखल करण्यात आले आहे. सध्याची समरी ट्रायल ही समन्स ट्रायलमध्ये रुपांतिरत करण्याची विनंती अर्जातून केली आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि पुराव्यांवर कोर्टात चर्चा व्हावी, यासाही हा अर्ज केल्याची माहिती पवार यांनी मंगळवारी दिली. समन्स ट्रायल ही तुलनेने लांबलचक कायदेशीर प्रक्रिया आहे.

Rahul Gandhi
Mamata Banerjee : "महाकुंभ आता मृत्यू कुंभ..." ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरूवात

वीर सावरकर यांच्या नातेवाईकांमार्फत दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना मागील महिन्यातच जामीन मिळाला आहे. कोर्टाने राहुल यांना उपस्थित राहण्यापासून मुभा देताना म्हटले आहे की, आरोपी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असून त्यांना अनेक बैठकांना उपस्थित राहावे लागते.

झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असून पुण्यात आल्यानंतर सुरक्षेची व्यवस्था करताना होणारा खर्च तसेच कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा विचारात घेऊन त्यांना सुनावणीला उपस्थित राहण्यापासून कायमस्वरुपी मुभा दिली जात असल्याचे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मागील महिन्यात राहुल गांधी हे सुनावणीला व्हर्च्यूअली उपस्थित राहिले होते. राहुल यांनी मार्च 2023 मध्ये लंडन येथे सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com