Delhi News: संसद भवन घुसखोरी प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित झा याने आज (शुक्रवारी) दिल्ली पोलिसांना नवीन माहिती दिली. ललित झा याची एका सरकारी संस्थेकडून मनोविश्लेषण चाचणी घेण्यात आली.
'या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मी नसून मनोरंजन हा आहे. त्याने हा डाव रचला होता. आमची जामिनावर सुटका होईल, असे आम्हाला वाटले होते. समाजात एक संदेश देण्यासाठी हे आम्ही केले. या प्रकारामुळे आम्हाला प्रसिद्ध मिळेल, त्याआधारे आम्ही आमचे संघटन मजबूत करणार होतो. त्याआधारे आम्हाला पुढील वाटचाल करायची होती. आमच्यावर यूएपीए (UAPA)नुसार कारवाई होईल, याचा आम्हाला अंदाज नव्हता,' अशी माहिती ललित झा याने आज दिली.
13 डिसेंबर रोजी संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ललित झा हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आतापर्यंतच्या होती. मात्र, आता ललित झा याने दिलेच्या कबुलीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ललित झा याला मदत करणारा त्याचा मित्र महेश कुमावत याचीही पोलिस चौकशी करीत आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न, मणिपूरमधील हिंसाचार, बेरोजगारी या मुद्यांवर लक्ष वेधण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे आरोपींना सांगितले. संघटना तयार करण्यासाठी मनोरंजन हा मोठा निधी उभा उभारण्याच्या तयारीत होता. सागर शर्मा हा संघटनेत युवकांची भरती करीत होता, असे ललित झा याने मनोविश्लेषण चाचणीत सांगितले.
आरोपीच्या सवयी, दिनचर्या, त्यांची समज या आधारे मनोविश्लेषक चाचणी करण्यात येते. आरोपीला समोर बसवून त्याला काही प्रश्न विचारण्यात येतात. त्याआधारे त्याने गुन्हा का केला, याची माहिती मानसशास्त्रज्ञ पोलिसांना देतात. काही महिन्यांपूर्वीच श्रद्धा वालकर हत्याकांडात पोलिसांनी पहिल्यांदा मनोविश्लेषक चाचणी घेतली होती.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.