Manoj Jarange: ...ही सभा नसून मराठ्यांच्या पोरांची वेदना ; जरांगे सरकारवर बरसले!

Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला ठणकावले...
manoj jarange rally in antarwali sarati
manoj jarange rally in antarwali saratiSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: 'मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे, अशी संधी पुन्हा येणार नाही. ही सभा नसून मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,' असे मनोज जरांगे-पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला ठणकावून सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाचवा टप्पा सध्या सुरु आहे. आज सेलूमध्ये (परभणी) जरांगेंची सभा झाली. सभेत त्यांनी सरकार आरक्षण कसे देत नाही, मी बघतोच, असा इशारा सरकारला दिला.

manoj jarange rally in antarwali sarati
Kolhapur Black Magic: धक्कादायक! सरपंचांच्या शेतात जादूटोणा; सरपंचांनी होळी करत...

मुंबईत मराठा मोर्चासाठी मराठा समाज जाणार असल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटिशा बजावल्या आहेत. त्यावर जरांगेंना संताप व्यक्त केला आहे. 'सरकारच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही, सरकारने मराठा समाजातील लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात. या नोटिशी सरकारने मागे घ्याव्यात,' अशी मागणी जरांगेंनी केली.

अंतरवली सराटी येथील आंदोलनात पोलिसांच्या लाठीमारात महिलांची डोकी फुटली. त्यांचे रक्त लेकरांवर सांडले. त्यांचा काय दोष होताआंदोल? आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका केली. जरागे म्हणाले, 'मी त्यांच्यावर (भुजबळ) आता बोलत नाही. शिष्टमंडळ माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की त्यांच्यावर बोलू नका, मात्र ते आरक्षणावर बोलले तर मी बोलणार', असे आपण स्पष्ट सांगितले. 'सरकारने या अगोदर आपल्याला वेळ मागून घेतला. आता पुन्हा वेळ मागत आहे. परंतु आता वेळ देणार नाही. आता सावध व्हा, आता देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षण घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही,' असे जरांगे म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

manoj jarange rally in antarwali sarati
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : 'आरक्षणाच्या विरोधात बोलला तर वाजवीलच' ; जरांगेंचा भुजबळांना शेलक्या शब्दात इशारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com