Arvind Kejriwal : भाजपवरील 'ते' आरोप केजरीवालांना भोवणार ? दिल्ली पोलिस दुसऱ्यांदा निवासस्थानी दाखल

Delhi Liquor Scam Case : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आत्तापर्यंत पाचवेळा ईडीने समन्स बजावले. मात्र, केजरीवाल हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आत्तापर्यंत पाचवेळा ईडीने समन्स बजावले. मात्र, केजरीवाल हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच केजरीवालांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. आता हेच आरोप केजरीवालांना भोवण्याची चिन्ह आहेत. (CM Arvind Kejriwal)

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपकडून आम आदमी पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असून भाजप दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच भाजपकडून 'आप'च्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर देण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. यानंतर भाजपकडून या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी तक्रार दाखल करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal
CM Arvind Kejriwal : मोठी बातमी ! दिल्लीत घडामोडींना वेग; केजरीवालांच्या निवासस्थानी अचानक पोलिस दाखल

भाजपने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी रात्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर केजरीवाल यांना नोटीस देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, केजरीवालांनी नोटीस स्वीकारली नाही. यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा गुन्हे शाखेचे पथक केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र, अद्याप केजरीवालांनी नोटीस स्वीकारली नाही.

दरम्यान, केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर घडामोडी वाढल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपासून दिल्लीत घडामोडींना वेग आल्यामुळे दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले आहे. केजरीवाल यांना देण्यात येणारी नोटीस त्यांनी का स्वीकारली नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे याबाबत 'आप'कडून काही स्पष्टीकरण देण्यात येत का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Arvind Kejriwal
Raj Thackeray Nashik Tour : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंनी जे केले ते राज ठाकरेंनी टाळले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com