Raj Thackeray Nashik Tour : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंनी जे केले ते राज ठाकरेंनी टाळले!

Thackeray avoid KalaRam Mandir visit : मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या नाशिक दौऱ्यात कार्यकर्त्यांची हितगुज करून मुंबईला रवाना झाले
Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj Thackeray
Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj ThackeraySarkarnama

Nashik News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपला नाशिकचा दौरा पूर्ण करून मुंबईला परतले. नाशिकच्या दौऱ्यात ते बहुचर्चित काळाराम मंदिराला भेट देतील, अशी चर्चा होती. मात्र, राज ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणे टाळले. (Raj Thackeray avoid Nashik KalaRam Mandir visit)

गेले महिनाभर अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा राजकीयदृष्ट्या विशेष चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. त्या सोहळ्याचे उद्दिष्ट आणि चर्चा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या दौऱ्यावर आल्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले होते. (Raj Thackeray Nashik Tour)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj Thackeray
Nilwande Water : निळवंड्याच्या पाण्याला राजकारणाच्या उकळ्या; थोरात समर्थकांनी विरोधकांना सुनावले

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या येथील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा केल्यानंतर खरे हिंदुत्ववादी कोण या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार शब्दबाण सोडण्यात येत होते. त्याला उत्तर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. गोदावरी आरती देखील केली होती.

या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा झाला. त्यामुळे राज ठाकरे देखील नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील अशी अपेक्षा होती. यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे कळते. मात्र जे पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे यांनी केले, त्याचे अनुकरण करणे राज ठाकरे यांनी टाळले. राज ठाकरे हे एक दिवस आधीच आपला दौरा आटपून मुंबईला रवाना झाले आहेत.

Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj Thackeray
Solapur NCP : कर्नाटकचे माजी आमदार अजितदादांच्या गळाला; सोलापूरचे माजी नगरसेवकही राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, त्याच दिवशी सकाळी कार्यकर्त्यांसह जाऊन श्री काळाराम मंदिरात पूजा केली होती. माजी महापौर अशोक मुर्तडक, अनिल मटाले, शहराध्यक्ष कोंबडे, बंटी कोरडे, अनंत सूर्यवंशी आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर चर्चेत आलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात राज ठाकरे गेले नाहीत. याची चर्चा त्यांच्या दौऱ्यानंतरही सुरू आहे.

Edited By : Vijay Dudhale

Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj Thackeray
Ajitdada Solapur Tour : अजितदादांनी दिला भाजपच्या दोन देशमुखांच्या मतदारसंघातील मोठ्या नेत्यांना वेळ...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com