Delhi Red Fort Car Blast : देशाची राजधानी दिल्ली येथे काल सायंकाळी एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो स्टेशन गेट नंबर एकजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर परिसरातील अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
तर एका आय-20 कारमध्ये हा ब्लास्ट झाल्याचं समोर आलं आहे. या ब्लास्टचा सुरक्षा यंत्रणाकडून तपास सुरू आहे. अशातच आता दिल्ली कार ब्लास्टच्या आधीचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ज्यामध्ये कारमध्ये दहशतवादी डॉ. उमर तोंडावर काळा मास्क लावून बसल्याचं दिसत आहे.
या सीसीटीव्ही फुटेमध्ये ब्लास्टच्या आधी आय-20 कार गर्दीतून जाताना दिसत आहे. कारच्या आतमध्ये एक व्यक्ती काळा मास्क लावून कार चालवत असल्याचं दिसत आहे. तर मास्क लावलेली ही व्यक्ती दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान आहे. त्याने ही कार नदीमला विकली होती. नदीमने ती फरीदाबादमधील कार डीलर रॉयल कार झोनला विकली. त्यानंतर ती तारिकने आणि नंतर उमरने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, उमर मोहम्मद गाडीत होता. त्याने त्याच्या दोन साथीदारांसह हल्ल्याची योजना आखली होती. फरीदाबादमध्ये अटक झाल्यानंतर घाबरून उमर मोहम्मदने हल्ल्याची योजना आखल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या साथीदारांसह त्याने गाडीत डिटोनेटर ठेवले आणि हे दहशतवादी कृत्य केल्याची माहिती असून या हल्ल्यासाठी त्याने ANFO (अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेल) वापरल्याचं सांगितलं जात आहे.
उमर हा जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे. या ब्लास्टनंतर देशभरातली विविध शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील स्फोटाच्या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. शिवाय या सर्व परिस्थितीचा आढावा घेत असल्याचंही मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.