Delhi CM Atishi : निवडणुकीआधी आतिशी यांना कोर्टाचा मोठा दिलासा; भाजप नेत्याला झटका

Pravin Kapoor Defamation Case Against Atishi : भाजप नेते प्रवीण शंकर कपूर यांनी मागील वर्षी ही याचिका दाखल केली होती.
Atishi
AtishiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी अवघे सात दिवस उरलेले असतानाच आपच्या नेत्या व दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील कोर्टाने त्यांच्याविरोधातील भाजप नेत्याची अब्रुनुकसानीची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भाजप नेत्याला झटका बसला आहे.

भाजप नेते प्रवीण शंकर कपूर यांनी मागील वर्षी ही याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने आज निकाल देताना याचिका फेटाळली. मागील वर्षी एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी आतिशी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर ईडीकडून महिनाभरात अटक होईल, असा आरोप आतिशी यांनी केला होता.

Atishi
Supreme Court Decision : सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश!; पोलिसांच्या 'त्या शॉर्टकट'ला बसणार लगाम

आतिशी आपल्या दाव्यावर ठाम होत्या. त्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत सडकून टीका केली होती. त्यानंतर कपूर यांनी आतिशी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याचिकेनंतर कोर्टाने आतिशी यांना समन्स पाठवले होते. त्याविरोधात आतिशी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

आतिशी यांच्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने कनिष्ठ कोर्टाचे समन्स रद्दबादल ठरवले. त्यामुळे आतिशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दिल्लीत सध्या निवडणुकीचे वार वाहत असून आतिशी या कालकाजी या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Atishi
Pratap Sarnaik : पालकमंत्री सरनाईक यांना मोह कामाचा नाही, तर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा!

दिल्लीमध्ये आपसमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान आहे. आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली आहे. लांबा या पूर्वी आपमध्येच होत्या. तर भाजपने माजी खासदाराला निवडणूक रिंगणात उतरवून आतिशी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com