Delhi Sewa Vidheyak: दिल्ली सेवा विधेयकावरून 'इंडिया'ची कसोटी; राज्यसभेत होणार घमासान

NDA Vs INDIA: मल्लीकार्जुन खर्गे यांच्या केबीनमध्ये ठरली रणनीती
Amit Shah, Mallikarjun Kharge, Arwind Kejariwal
Amit Shah, Mallikarjun Kharge, Arwind KejariwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi Services Bill News: दिल्ली सरकारच्या अधिकारांवर घाला घालणारे वादग्रस्त ठरलेले दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून ते सोमवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयक मंजूर होऊ नये यासाठी इंडियातील काँग्रेस आणि आम आदमीसह सर्व पक्ष एकवटले आहेत. या विधेयकावरून राज्यसभेत घमासान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हे विधेयक किती मतांनी मंजूर होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. (Marathi Politics News)

दिल्ली सेवा विधेयक बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, आप या पक्षांनी आपल्या खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. राज्यसभेतील रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विरोधी पक्षाची मल्लिकार्जुन खर्गे यांच्या केबिनमध्ये 'इंडिया'ची बैठक पार पडली. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे या विधेयकावर राज्यसभेत मोठे घमासान होणार असल्याचे बोलले जात आहे.

Amit Shah, Mallikarjun Kharge, Arwind Kejariwal
Loksabha Restores Rahul Gandhi's Membership: मोदींच्या विरोधात राहुल गांधी आता पुन्हा रान उठवतील..

राज्यसभेत आपसह विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीने या विधेयकाला विरोध केला आहे. दरम्यान, बिजू जनता दल (बीजेडी)ने समर्थन दिल्याने विधेयक संमत करून घेण्यास भाजपाला अडचण नाही. राज्यसभेत भाजपच बहुमत काठावर असल्यामुळे वायएसआर, तेलगू देशम पार्टी (टीडीपी), बीजेडी या पक्षाच्या जोरावर भाजप हे विधेयक मंजूर करून घेऊ शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र या विधेयकाच्या चर्चेवेळी राज्यसभेत मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

Amit Shah, Mallikarjun Kharge, Arwind Kejariwal
Rahul Gandhi's Lok Sabha: मोठी बातमी ! अखेर राहुल गांधींना खासदारकी बहाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत 'सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली' (सुधारणा) विधेयक, 2023 सादर करणार आहेत. दिल्ली सेवा विधेयक राष्ट्रीय राजधानीतील सेवांच्या नियमनाच्या अध्यादेशाची जागा घेईल. सोमवारी राज्यसभेमध्ये मांडल्या जाणाऱ्या विषयांमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधेयक अंतिम विचारासाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. या विधेयकाला आपने जोरदार विरोध केला आहे. 'आप'ला काँग्रेससह 'इंडिया' आघाडीने पाठिंबा दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com