Loksabha Restores Rahul Gandhi's Membership: मोदींच्या विरोधात राहुल गांधी आता पुन्हा रान उठवतील..

Rahul Gandhi Restores Membership Of Wayanad MP: न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यावर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आनंद व्यक्त करीत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

चव्हाण म्हणाले, "राहुल गांधी यांनी खासदारकी पुन्हा बहाल केल्यामुळे मोदी सरकारला चपराक बसली आहे. लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात राहुल गांधींनी बोलू नये, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची भावना सगळ्यांची होती. या निर्णयामुळे त्यांना बोलण्यापासून मोदी सरकारने थांबवू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे,"

Rahul Gandhi News
Maharashtra Cabinet Expansion : कोल्हापूर जिल्ह्यात दुसरे मंत्रिपद मिळणार का ? 'या' आमदाराचे नाव चर्चेत..

"राहुल गांधी पुन्हा संसदेत येणार असल्यामुळे काँग्रेसला फायदा होणार आहे. विरोधकांच्या 'इंडिया'ला यामुळे बळ मिळेल. त्यांच्या खासदारकीमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावर त्यांना मतदान करता येणार आहे. आता मणिपूर हिंसाचारावरून ते लोकसभेत रान उठवतील, असे चव्हाण म्हणाले.

लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat ) या बाबत एक अध्यादेश काढण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Rahul Gandhi News
Kumar Saptarshi PIL Filed ON Bhide : भिडेंच्या अडचणीत वाढ ; कुमार सप्तर्षीं यांच्याकडून जनहित याचिका दाखल

मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यावर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्षेला स्थगिती दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. चार ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. तीन दिवसांनंतर त्यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com