Delhi Services Bill : दिल्ली सेवा विधेयक सोमवारी राज्यसभेत; काँग्रेस अन् 'आप'ने खासदारांना बजावला व्हिप

AAP News : राजकीयदृष्ट्या वादग्रस्त दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.
Amit Shah, Arvind Kejriwal News
Amit Shah, Arvind Kejriwal NewsSarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session News : राजकीयदृष्ट्या वादग्रस्त दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक सोमवार (ता.७ जुलै) राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या विधेयकाला विरोध करत आहेत. त्यामुळेच दोन्ही पक्षांनी राज्यसभेच्या खासदारांसाना व्हिप जारी केला आहे. काँग्रेस आणि 'आप'ने (AAP) त्यांच्या राज्यसभा खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिल्ली सेवा विधेयकाबाबत, काँग्रेसने (Congress) आपल्या राज्यसभा खासदारांना ७ ऑगस्ट रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. यासोबतच आम आदमी पक्षानेही खासदारांना ७ आणि ८ ऑगस्टसाठी व्हीप बजावला आहे.

Amit Shah, Arvind Kejriwal News
Eknath Shinde's 'B Plan' : एकनाथ शिंदेंकडे ‘बी प्लॅन’ तयार आणि तो कधीही फेल जात नाही; अब्दुल सत्तारांचे पंढरपुरात विधान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सोमवारी राज्यसभेत 'सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली' (सुधारणा) विधेयक, 2023 सादर करणार आहेत. दिल्ली सेवा विधेयक राष्ट्रीय राजधानीतील सेवांच्या नियमनाच्या अध्यादेशाची जागा घेईल. सोमवारी राज्यसभेमध्ये मांडल्या जाणाऱ्या विषयांमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे.

Amit Shah, Arvind Kejriwal News
Delhi Service Bill : केजरीवालांची धडधड वाढली; दिल्ली प्रशासनावर हुकूमत कुणाची? सोमवारी होणार फैसला

प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधेयक अंतिम विचारासाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. अमित शाह राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली कायदा, 1991 आणि लोकसभेने मंजूर केलेले दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी राज्यसभेत मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. या विधेयकाला आपने जोरदार विरोध केला आहे. 'आप'ला काँग्रेससह 'इंडिया' आघाडीने पाठिंबा दिला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com