Delhi Service Bill : केजरीवालांची धडधड वाढली; दिल्ली प्रशासनावर हुकूमत कुणाची? सोमवारी होणार फैसला

Amit Shah Vs Arvind Kejariwal : दिल्ली प्रशासनावर कुणाची हुकूमत चालणार? उद्या होणार स्पष्ट
Amit Shah Vs Arvind Kejariwal
Amit Shah Vs Arvind KejariwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या अधिकाराशी संबंधित असलेले 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता समोवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची धडधड वाढली आहे.

दिल्ली सेवा विधेयकामध्ये दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या संबंधित अंतिम अधिकार उपराज्यपालांना देण्याची तरतूद आहे. त्यामुळे लोकसभेनंतर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर केजरीवाल सरकारसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Amit Shah Vs Arvind Kejariwal
Delhi Service Bill: केजरीवाल सरकारला मोठा झटका; 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत मंजूर

या विधेयकाच्या मंजूरीदरम्यान विरोधकांची परीक्षा पाहयला मिळणार असून दिल्ली प्रशासनावर अमित शाह यांची की अरविंद केजरीवाल यांच्या पैकी कुणाची हुकूमत चालणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग आणि बदल्यांचे अधिकार हे दिल्ली सरकारचे असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिला होता. मात्र, यानंतर केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत न्यायालयाचा हा निर्णय पलटवला.

या विधेयकाला संसदेत विरोध करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत विधेयकाच्या मंजूरीला विरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, लोकसभेत मोदी सरकारचे बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर झाले. तर आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com